​हृतिक रोशनला मागे टाकत शाहिद कपूर बनला ‘सेक्सिएस्ट एशियन मॅन’!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2017 13:00 IST2017-12-14T07:30:48+5:302017-12-14T13:00:48+5:30

बॉलिवूड स्टार शाहिद कपूर अनेकांना मागे टाकत जगातील सर्वाधिक ‘सेक्सिएस्ट एशियन मॅन’ बनला आहे. ‘इस्टर्न आय’ या ब्रिटनच्या एका ...

Shahid Kapoor becomes 'Sexiest Asian Man' behind Hrithik Roshan | ​हृतिक रोशनला मागे टाकत शाहिद कपूर बनला ‘सेक्सिएस्ट एशियन मॅन’!

​हृतिक रोशनला मागे टाकत शाहिद कपूर बनला ‘सेक्सिएस्ट एशियन मॅन’!

लिवूड स्टार शाहिद कपूर अनेकांना मागे टाकत जगातील सर्वाधिक ‘सेक्सिएस्ट एशियन मॅन’ बनला आहे. ‘इस्टर्न आय’ या ब्रिटनच्या एका साप्ताहिकाने जाहिर केलेल्या ‘सेक्सिएस्ट एशियन मॅन’च्या यादीत शाहिदने पहिले स्थान पटकावले आहे. ब्रिटीश पाकिस्तानी गायक जायन मलिक याला मागे टाकत शाहिदने हे स्थान मिळवले.



गतवर्षी जायन या यादीत अव्वल स्थानी होता. यंदा जायन मलिक या यादीत तिस-या क्रमांकावर फेकल्या गेला.



दुस-या क्रमांकावर हृतिक रोशनने कब्जा जमवला. गत तीन वर्षांपासून हृतिक क्रमांक दोनच्या स्थानावर कब्जा करून आहे.
‘सेक्सिएस्ट एशियन मॅन’चा किताब मिळवल्यानंतर शाहिदने सर्वांचे आभार मानले आहेत. हा टॅग माझ्यासाठी सन्माननिय आहे. माझ्या मते, सेक्सीचा अर्थ केवळ शारिरीक अंगाने घेतला जाऊ शकत नाही. सेक्सी असणे हे आयुष्याच्या मानसिक पैलूंशीही निगडीत आहे. ‘सेक्सिएस्ट एशियन मॅन’चा किताब मिळवण्याचे सगळे श्रेय मी माझ्या चाहत्यांना देईल, अशा शब्दांत शाहिदने सर्वांचे आभार मानलेत.



ALSO READ : शाहिद कपूरने इतकी घेतली मेहनत की, पाच दिवसांत घटले चार किलो वजन!

‘सेक्सिएस्ट एशियन मॅन’च्या यादीत  चौथ्या क्रमांकावर टीव्ही अभिनेता विवियन डेसेना आहे.
टीव्ही अभिनेता आशीष शर्मा पाचव्या तर   पाकिस्तानी अभिनेता फवाद खान या यादीत सहाव्या स्थानावर आहे.  दरवर्षी ‘सेक्सिएस्ट एशियन मॅन’ची यादी जाहिर केली जाते. अभिनेत्रींचे सांगायचे तर यंदा या यादीत इंटरनॅशनल स्टार प्रियांका चोप्राने पहिले स्थान पटकावले आहे. प्रियांकाने पाचव्यांदा आशियाच्या सर्वाधिक सेक्सी महिलेचे टायटल जिंकले आहे. तिच्यानंतर या यादीत निया शर्मा, दीपिका पादुकोण, आलिया भट्ट व माहिरा खान यांचा क्रमांक आहे.
सध्या शाहिद ‘पद्मावती’मध्ये बिझी आहे. या चित्रपटाचे प्रदर्शन तूर्तास वांद्यात सापडले आहे. या चित्रपटात शाहिद कपूर राजा रतन सिंह म्हणजे राणी पद्मिनीच्या पतीच्या भूमिकेत आहे.  याशिवाय ‘बत्ती गुल मीटर चालू’ हा चित्रपटही शाहिदने साईन केला आहे.

Web Title: Shahid Kapoor becomes 'Sexiest Asian Man' behind Hrithik Roshan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.