​पद्मावतीनंतर शाहिद कपूर होणार ‘बेकार’

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2017 19:34 IST2017-02-22T14:04:08+5:302017-02-22T19:34:08+5:30

बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूरचा ‘रंगून’ हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होत असून या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटाच्या रिलीजनंतर ...

Shahid Kapoor to be 'useless' after Padmavati | ​पद्मावतीनंतर शाहिद कपूर होणार ‘बेकार’

​पद्मावतीनंतर शाहिद कपूर होणार ‘बेकार’

लिवूड अभिनेता शाहिद कपूरचा ‘रंगून’ हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होत असून या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटाच्या रिलीजनंतर तो दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या ‘पद्मावती’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त होणार आहे. मात्र, पद्मावतीनंतर कोणत्या चित्रपटात काम करणार आहे या प्रश्नाच्या उत्तरात त्याने मी बेकार होणार असल्याचे सांगितले. 

रेडिफ डॉट कॉम या संके तस्थळाला दिलेल्या मुलाखतीमध्ये  शाहिद कपूरला ‘रंगून’ व ‘पद्मावती’ या चित्रपटानंतर तू कोणता चित्रपट करणार आहेस? असा प्रश्न त्याला विचारला. यावर उत्तर देताना शाहिद म्हणाला, ‘मी या दोन सिनेमांनंतर बेकार आहे’ असे सांगितले. रंगून सिनेमा प्रदर्शनसाठी रेडी असला तरी माझ्याकडे सध्या पद्मावती हा चित्रपट आहे. या चित्रपटाचे चित्रिकरण पूर्ण व्हायचे आहे.पद्मावतीच्या चित्रिकरण सुमारे  २०० दिवस चालू शकते. आता केवळ २५ दिवसाचे चित्रिकरण झाले आहे. मला अनेक चित्रपटांच्या आॅफर येत आहेत. मात्र, पद्मावतीचे शूटिंग पूर्ण झाल्याशिवाय मी दुसरा चित्रपट स्वीकारणार नसल्याचे शाहिदने सांगितले. 



शाहिद कपूरचा रंगून २४ फेब्रुवारीला प्रदर्शित होत असून हा चित्रपट माझ्यासाठी खास असल्याचे शाहिद म्हणाला. माझी मुलगी मिशाच्या जन्मानंतर हा चित्रपट प्रदर्शित होत असल्याने माझ्यासाठी हा चित्रपट महत्त्वाचा ठरणार आहे. विशाल भारद्वाज दिग्दर्शित रंगून मध्ये शाहिद कपूरसह कंगना रणौत व सैफ अली खान यांच्या मुख्य भूमिका आहेत. शाहिद विशालसोबत तिसºयांदा काम करीत असला तरी देखील कंगना आणि सैफ सोबत त्याचा हा पहिलाच चित्रपट आहे. याआधी शाहिदने विशाल भारद्वाज यांच्यासोबत कमिने व हैदर या चित्रपटात मुख्य भूमिका साकारल्या आहेत.

 सैफ अली खानसोबत काम करण्याचा अनुभव शेअर करताना शाहिदने त्याला चांगला आणि कुल अभिनेता असल्याचे सांगितले. कंगनासोबत माझे संबध चांगले असल्याचेही तो म्हणाला. आमच्यात कोणतेही वाद नाहीत असे त्याने नमूद केले. 

Web Title: Shahid Kapoor to be 'useless' after Padmavati

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.