शाहरूख खानच्या रिल लाइफ आजीचे निधन!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2018 19:04 IST2018-01-17T13:34:04+5:302018-01-17T19:04:04+5:30
‘देवदास’ या सुपरहिट चित्रपटात अभिनेता शाहरूख खानच्या आजीची भूमिका साकारणाºया अवा मुखर्जी यांचे वयाच्या ८८व्या वर्षी निधन झाले. अवा ...

शाहरूख खानच्या रिल लाइफ आजीचे निधन!
‘ ेवदास’ या सुपरहिट चित्रपटात अभिनेता शाहरूख खानच्या आजीची भूमिका साकारणाºया अवा मुखर्जी यांचे वयाच्या ८८व्या वर्षी निधन झाले. अवा मुखर्जी यांचे चित्रपटसृष्टीत प्रचंड योगदान राहिले आहे. त्यामुळे त्यांच्या निधनाने संपूर्ण बॉलिवूडमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. अवा मुखर्जी यांनी मोठ्या पडद्याबरोबरच छोट्या पडद्यावरही योगदान दिले आहे. त्याचबरोबर जाहिरातींमध्येही त्यांनी काम केले आहे.
१९६३ मध्ये अवा मुखर्जी यांनी एका बंगाली चित्रपटातून आपल्या अभिनय करिअरला सुरुवात केली. त्यांच्या या चित्रपटाचे नाव ‘राम ढाका’ असे होते. हा चित्रपट तारू मुखर्जी यांनी दिग्दर्शित केला होता. २००० या सालात त्या ‘स्निप’ या चित्रपटात बघावयास मिळाल्या होत्या. पुढे २००२ मध्ये अवा यांनी संजय लीला भन्साळी यांच्या ‘देवदास’ या चित्रपटात एक महत्त्वपूर्ण भूमिका साकारली. या चित्रपटात त्यांनी शाहरूख खानच्या आजीची भूमिका निभावली होती.
पुढे २००९ मध्ये त्या ‘डिटेक्टिव नानी’ या चित्रपटात मुख्य भूमिकेत बघावयास मिळाल्या. हा चित्रपट अवा मुखर्जी यांची मुलगी रोमिला मुखर्जी यांनी दिग्दर्शित केला आहे. दरम्यान, अवा मुखर्जी यांच्या निधनामुळे बॉलिवूडमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. अनेकांकडून सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आहे.