Video: 'स्वदेस'फेम बॉलिवूड अभिनेत्रीचा विदेशात भीषण कार अ‍ॅक्सिडेंट; अपघातात एका जोडप्याचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2023 08:31 AM2023-10-04T08:31:36+5:302023-10-04T08:32:04+5:30

Gayatri joshi: इटलीच्या सार्डिनिया या भागात गायत्री तिचा पती विकास ओबेरॉय यांच्यासोबत लॅम्बोर्गिनी या कारमधूम प्रवास करत होती.

shah-rukh-khan-swades-actress-gayatri-joshi-and-her-businessman-husband-vikas-oberoi-recently-met-with-a-car-accident-in-italy | Video: 'स्वदेस'फेम बॉलिवूड अभिनेत्रीचा विदेशात भीषण कार अ‍ॅक्सिडेंट; अपघातात एका जोडप्याचा मृत्यू

Video: 'स्वदेस'फेम बॉलिवूड अभिनेत्रीचा विदेशात भीषण कार अ‍ॅक्सिडेंट; अपघातात एका जोडप्याचा मृत्यू

googlenewsNext

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान (shahrukh khan) याच्या 'स्वदेस' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या गायत्री जोशी या प्रसिद्ध अभिनेत्रीचा नुकताच मोठा अपघात झाला आहे. गायत्री आणि तिचा पती इटलीमध्ये प्रवास करत असताना त्यांच्या कारची दुसऱ्या कारला धडक बसली या अपघातामध्ये फरारी कारने प्रवास करणाऱ्या जोडप्याचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेचा लाइव्ह व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून पुढील कारवाई सुरू केली.

सूत्रांच्या माहितीनुसार, इटलीच्या सार्डिनिया या भागात गायत्री तिचा पती विकास ओबेरॉय यांच्यासोबत लॅम्बोर्गिनी या कारमधूम प्रवास करत होती. यावेळी प्रवास करत असताना एका मिनी ट्रकला ओव्हरटेक करत असताना त्यांची कार एका फरारी गाडीला धडकली. इतकंच नाही तर या धडकेमुळे ही फारारी गाडी अन्य एका मिनी ट्रकला धडकली. या धडकेमुळे मिनी ट्रक उलटला असून फरारीला आग लागली. या सगळ्यामध्ये फरारीने प्रवास करणाऱ्या जोडप्याचा जागीच मृत्यू झाला आहे.

मेलिसा क्रॉटली आणि मार्कस क्रॉटली अशी मृतांची नाव असून दोघेही स्वित्झर्लंडचे होते. या अपघाताविषयी गायत्रीने एका संकेतस्थळाला माहिती दिली. 'मी आणि विकास दोघेही इटलीमध्ये आमचा अपघात झाला आहे. पण, देवाच्या कृपेने आम्हाला काहीही झालं नाही. आम्ही सुखरुप आहोत', असं तिने सांगितलं.

सध्या सोशल मीडियावर या अपघाताचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा अपघात अंगावर काटा आणणारा आहे. या अपघातात एकामागून एक वाहने धडाधड एकमेकांवर आदळतांना दिसत आहेत.

दरम्यान, गायत्रीने २००४ मध्ये स्वदेस सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. परंतु, केवळ हा एकच सिनेमा करुन तिने इंडस्ट्रीमधून काढता पाय घेतला. गायत्रीने १९९९ मध्ये फेमिना मिस इंडिया या स्पर्धेपासून करिअरची सुरुवात केली होती. इतकंच नाही तर तिने २०००मध्ये मिस इंडिया इंटरनॅशनलचा खिताब जिंकला होता. परंतु, यश, प्रसिद्धी मिळवूनही तिने इंडस्ट्रीला रामराम केला. स्वदेसनंतर ती कोणत्याही सिनेमा दिसली नाही. गायत्रीने ओबेरॉय कन्स्ट्रक्शनचे व्यवस्थापकीय संचालक विकास ओबेरॉय यांच्याशी लग्न केलं आहे.

Web Title: shah-rukh-khan-swades-actress-gayatri-joshi-and-her-businessman-husband-vikas-oberoi-recently-met-with-a-car-accident-in-italy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.