शाहरुखचा लेक अबरामच्या हातातील बॅग पाहून नेटकऱ्यांनी अनन्याला केलं ट्रोल, म्हणाले- लाज वाटली पाहिजे...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2024 01:51 PM2024-04-27T13:51:44+5:302024-04-27T13:52:46+5:30

अनन्याचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. या व्हिडिओत अनन्याबरोबर शाहरुख खानचा लेक अबरामही दिसत आहे. अनन्याचा हा व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. 

shah rukh khan son abram seen holding ladies handbag netizens troll ananya panday video viral | शाहरुखचा लेक अबरामच्या हातातील बॅग पाहून नेटकऱ्यांनी अनन्याला केलं ट्रोल, म्हणाले- लाज वाटली पाहिजे...

शाहरुखचा लेक अबरामच्या हातातील बॅग पाहून नेटकऱ्यांनी अनन्याला केलं ट्रोल, म्हणाले- लाज वाटली पाहिजे...

नखरेल अदा आणि हटके अंदाजाने प्रेक्षकांची मनं जिंकणारी बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे सध्या चर्चेत आहे. अनन्याचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. या व्हिडिओत अनन्याबरोबर शाहरुख खानचा लेक अबरामही दिसत आहे. अनन्याचा हा व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. 

अनन्याला नुकतंच एअरपोर्टवर स्पॉट करण्यात आलं होतं. या व्हिडिओत अनन्याबरोबरच अबरामही दिसत आहे. अबरामच्या हातात एक मोठी लेडिज बॅग दिसत आहे. ती बॅग घेऊन अबराम चालत आहे. तर अनन्या मात्र एका हातात मोबाईल घेऊन चालत आहे. तर तिने दुसरा हात अबरामच्या खांद्यावर ठेवल्याचं दिसत आहे. अबरामच्या हातातील बॅग पाहून नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. अनन्याचं हे वागणं नेटकऱ्यांना रुचलेलं नाही. त्यामुळे नेटकऱ्यांनी अनन्याला ट्रोल केलं आहे. 

 एका इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन अनन्या आणि अबरामचा हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. "एका छोट्या मुलाला बॅग उचलायला लावली, थोडी तरी लाज बाळग", "असं नव्हतं करायला पाहिजे" अशा कमेंट करत नेटकऱ्यांनी अनन्याला ट्रोल केलं आहे. तर अनेकांनी "बाप तसा मुलगा" म्हणत अबरामचं कौतुकही केलं आहे. एकाने कमेंट करत ही बॅग सुहानाचं असल्याचं म्हटलं आहे. पण, बॅग सुहानाची असली तरी अबरामकडे नव्हती द्यायला पाहिजे, असंही काहींनी म्हटलं आहे. 

Web Title: shah rukh khan son abram seen holding ladies handbag netizens troll ananya panday video viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.