शाहरूख खानने लेक सुहानाबरोबर पुन्हा शेअर केला फोटो; सुहानाला लॉन्च करण्याची ही तयारी तर नसावी?
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2017 19:22 IST2017-09-03T13:51:49+5:302017-09-03T19:22:30+5:30
सुपरस्टार शाहरूख खान याची लाडकी लेक सुहाना खान सध्या भलतीच चर्चेत आहे. ज्या पद्धतीने शाहरूख खान कोणत्याही अॅक्टिव्हीटीने त्याच्या ...
.jpg)
शाहरूख खानने लेक सुहानाबरोबर पुन्हा शेअर केला फोटो; सुहानाला लॉन्च करण्याची ही तयारी तर नसावी?
स परस्टार शाहरूख खान याची लाडकी लेक सुहाना खान सध्या भलतीच चर्चेत आहे. ज्या पद्धतीने शाहरूख खान कोणत्याही अॅक्टिव्हीटीने त्याच्या चाहत्यांमध्ये टॉपिक आॅफ इंट्रेस्ट असतो, तसेच काहीसे त्याचे स्टारकिड्स लोकांमध्ये चर्चेत असतात. या यादीत सर्वात अगोदर शाहरूखची मुलगी सुहाना खान हिचे नाव आहे. या अगोदर जेव्हा सुहानाचा शाहरूखसोबत एक फोटो समोर आला होता, तेव्हा सोशल मीडियावर चांगली चर्चा रंगली होती. आता पुन्हा एकदा स्वत: शाहरूख खानने एक फोटो शेअर केला असून, सोशल मीडियावर याबाबतची चर्चा रंगली आहे. फोटोमध्ये शाहरूख प्रिन्सेस सुहानासोबत बघावयास मिळत आहे. शाहरूखने हा फोटो त्याच्या ट्विटर हॅण्डलवरून शेअर केला आहे.
शाहरूखने फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘जेव्हा लहानगे शाळेत परत जातात तेव्हा कोणालाच याबाबतची जाणीव होत नाही की, आपल्याला किती वेळा आजमाविले गेले आहे.’ आता शाहरूखने हा फोटो का शेअर केला असावा? शिवाय त्याने दिलेल्या कॅप्शनचा अर्थ काय? असे प्रश्न सध्या उपस्थित केले जात आहेत. एक असाही मतप्रवाह समोर येत आहे की, लवकरच शाहरूख सुहानाला लॉन्च करण्याची तयारी करीत असावा. त्यामुळे शाहरूखचा हा फोटो सध्या सोशल मीडियावर सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.
दरम्यान, फोटोमध्ये शाहरूख आणि सुहानाने काळा चष्मा घातलेला आहे. वास्तविक हा फोटो ब्लॅक अॅण्ड व्हाइट आहे. ज्यामध्ये रेड, ब्ल्यू आणि ब्राउन कलरला फिल्टर केले गेले आहे. फोटोमध्ये सुहाना खूपच सुंदर दिसत आहे. शाहरूखचा अनुष्का शर्मासोबतचा ‘जब हॅरी मेट सेजल’ हा चित्रपट नुकताच रिलीज झाला आहे. या चित्रपटाने बॉक्स आॅफिसवर फारसा करिष्मा दाखविला नाही. यावर्षी शाहरूखचा रिलीज झालेला हा दुसरा चित्रपट होता. याचवर्षी २५ जानेवारी रोजी शाहरूखचा ‘रईस’ रिलीज झाला होता.

}}}} ">When the little one goes back to school & there is nobody to point out that u r using too many filters! pic.twitter.com/KKU9wRsRi9— Shah Rukh Khan (@iamsrk) September 3, 2017
When the little one goes back to school & there is nobody to point out that u r using too many filters! pic.twitter.com/KKU9wRsRi9— Shah Rukh Khan (@iamsrk) September 3, 2017