शाहरूख खान म्हणतोय, महिलांना समान दर्जा देणे हा त्यांचा अधिकारच...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2017 13:59 IST2017-03-07T06:54:03+5:302017-03-07T13:59:38+5:30

सुपरस्टार शाहरूख खानच्या मते, ‘महिला सशक्तिकरण’ हा शब्दच मुळात खटकणारा आहे. कारण महिला या सशक्तच आहेत. त्यामुळे त्यांना पुरुषांच्या ...

Shah Rukh Khan says that his right to give women equal status ... | शाहरूख खान म्हणतोय, महिलांना समान दर्जा देणे हा त्यांचा अधिकारच...

शाहरूख खान म्हणतोय, महिलांना समान दर्जा देणे हा त्यांचा अधिकारच...

परस्टार शाहरूख खानच्या मते, ‘महिला सशक्तिकरण’ हा शब्दच मुळात खटकणारा आहे. कारण महिला या सशक्तच आहेत. त्यामुळे त्यांना पुरुषांच्या तुलनेत समान दर्जा देणे हा त्यांचा अधिकारच असल्याचे त्याने म्हटले आहे. 

शाहरूख एका शोमध्ये सहभागी झाला असता, त्याने महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर महिलांप्रतीचे हे वक्तव्य केले. पुढे बोलताना शाहरूख म्हणाला की, आपण नेहमीच महिला सशक्तिकरणाविषयी बोलत असतो. परंतु माझ्या मते असे बोलणे म्हणजे, ‘ग्रहाचीच रक्षा करणे’ होय. कारण, तुम्ही ग्रहाची रक्षा करीत नसून ग्रहच तुमची रक्षा करीत असतो. महिलांबाबतीत असेच काहीसे आहे. त्यामुळे त्यांना समान दर्जा द्यायलाच हवा.  



खरं तर महिला या पुरुषांच्या तुलनेत अधिक सशक्त आहे. त्यामुळे आपण महिलांना त्या सर्व संधी द्यायला हव्यात जो त्यांचा अधिकार आहे. डिझायनर मनीष मल्होत्रा याच्या कलेक्शनमध्ये शो स्टॉपर्स म्हणून शाहरूख आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा उपस्थित होते. हा शो शबाना आजमी यांच्या मिजवान चॅरिटी फॅशन शो २०१७ साठी आयोजित करण्यात आला होता.  

यावेळी शाहरूखने दिलखुलासपणे आपले विचार व्यक्त करताना जगात पुरुषांचा दबदबा असल्याचेही मान्य केले. तो म्हणाला की, जगात पुरुषांचे वर्चस्व आहे. त्यामुळेच अजूनही आपण ही बाब अगदी सहजतेने घेतो. त्यामुळे आता महिलांचे कर्तृत्त्व डावलून चालणार नाही. त्यांना पुरुषांच्या तुलनेत समान संधी द्यायलाच हवी. जेव्हा एका महिलेला शिक्षणाचे दरवाजे उघडे करून दिले जातात तेव्हा पुरुषांच्या तुलनेत ते सर्वाधिक फायदेशीर ठरते. कारण ती महिला तिच्या मुलांना, समाजाला आणि तिच्या जवळ असणाºया प्रत्येक घटकाला ज्ञानाच्या कक्षेत ओढण्याचा प्रयत्न करीत असते, हे सहसा पुरुषांकडून होत नसल्याचेही शाहरूख म्हणाला. 

यावेळी शबाना आझमी यांनी शाहरूखचे तोंडभरून कौतुक केले. त्या म्हणाल्या की, शाहरूख असा अभिनेता आहे, जो त्याच्या सिनेमांमध्ये महिलांना अधिक संधी देत असतो. बºयाचदा आपल्याला असेही बघावयास मिळाले की, महिला केंद्रित सिनेमांमध्ये शाहरूखने दुय्यम भूमिका स्वीकारली आहे. यावेळी शबाना यांनी, ‘डियर जिंदगी’ या सिनेमाचे उदाहरण दिले. 

Web Title: Shah Rukh Khan says that his right to give women equal status ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.