शाहरूख खानचा सर्जरीवर खुलासा; अ‍ॅक्शन स्टंट नव्हे तर रोमान्स सीन्समुळे होते दुखापत!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2017 16:34 IST2017-03-18T11:04:38+5:302017-03-18T16:34:38+5:30

गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूडचा रोमान्स किंग शाहरूख खानच्या बाबतीत एक बातमी सातत्याने कानावर पडत आहे. ती म्हणजे शाहरूखच्या डाव्या ...

Shah Rukh Khan reveals surgery; The action of the stunts was caused by the romance sin! | शाहरूख खानचा सर्जरीवर खुलासा; अ‍ॅक्शन स्टंट नव्हे तर रोमान्स सीन्समुळे होते दुखापत!

शाहरूख खानचा सर्जरीवर खुलासा; अ‍ॅक्शन स्टंट नव्हे तर रोमान्स सीन्समुळे होते दुखापत!

ल्या काही दिवसांपासून बॉलिवूडचा रोमान्स किंग शाहरूख खानच्या बाबतीत एक बातमी सातत्याने कानावर पडत आहे. ती म्हणजे शाहरूखच्या डाव्या शोल्डरला दुखापत झाली असून, त्याच्यावर लवकरच सर्जरी केली जाणार आहे. या अगोदरदेखील त्याच्या उजव्या शोल्डरवर सर्जरी केली गेली होती. जेव्हा शाहरूखला याविषयी विचारण्यात आले तेव्हा त्याने केलेला खुलासा आश्चर्यचकित करणारा होता. तो म्हणाला की, अशाप्रकारच्या दुखापती मला अ‍ॅक्शन सीन्स करताना होत नसून, लव मेंकिग सीन्समुळे मी दुखापतग्रस्त होत असल्याचे त्याने म्हटले. आता शाहरूखच्या या खुलाशात कितपत तथ्य आहे, हे सांगणे जरा मुश्कीलच म्हणावे लागेल. 

नुकत्याच झालेल्या एका प्रेस कॉन्फरन्समध्ये शाहरूखने म्हटले होते की, हे सांगतानादेखील मला विचित्र वाटते. कारण मला कधीच अ‍ॅक्शन सीन्स शूट करताना दुखापत झाली नाही तर, रोमान्स सीन्स शूट करताना मला दुखापतग्रस्त व्हावे लागले. कदाचित मी रोमॅण्टिक अभिनेता असल्याने असे घडत असावे, असेही तो म्हणाला. पुढे बोलताना तो म्हणाला की, केवळ शोल्डरमध्येच नव्हे तर माझ्या गुडघ्यांमध्येदेखील काही दिवसांपासून त्रास जाणवत आहे. हा त्रास मला एका डान्स दरम्यान जाणवायला लागल्याचे त्याने म्हटले. 



शाहरूख त्याच्या कामात खूपच प्रोफेशनल असतो. त्यामुळे तो कुठलाही सीन शूट करताना त्यात जीव ओततो. शक्यतो डमीचा वापर न करता स्वत:च सीन शूट करावा असा त्याचा नेहमीच अट्टहास असतो. त्यामुळेच त्याला बºयाचवेळा सर्जरीचा सामना करावा लागला. शाहरूखच्या फॅमिली डॉक्टरने त्याच्या सर्जरीविषयी बोलताना म्हटले होते की, शाहरूख स्वत:च कुठलाही स्टंट करीत असतो. त्यामुळे बºयाचदा त्याला दुखापत होते. एक खतरनाक स्टंट शूट करताना त्याच्या बॅकला दुखापत झाली होती. 
 
शाहरूख गेल्या २५ वर्षांपासून नानावटी हॉस्पिटलमध्येच उपचार घेत आहे. डॉ. अली किंग खानवर नियमित उपचार करीत आले आहेत. शाहरूखच नव्हे तर बहीण, पत्नी आणि मुलांवरदेखील डॉ. अली हेच उपचार करीत आहेत. दोन दिवसांपूर्वी आलिया भट्टच्या बर्थ डे पार्टीप्रसंगी शाहरूखच्या कारने एका फोटोग्राफरला धडक दिल्याने जखमी फोटोग्राफरवर नानावटी हॉस्पिटलमध्येच उपचार करण्यात आले होते. या फोटोग्राफरच्या उपचाराचा सर्व खर्च शाहरूखने दिला होता. 

Web Title: Shah Rukh Khan reveals surgery; The action of the stunts was caused by the romance sin!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.