मकर संक्रातीला शाहरुख खान उडवणार ‘पतंग’
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2017 18:13 IST2017-01-09T18:13:05+5:302017-01-09T18:13:05+5:30
जानेवारीचा महिना येताच आकाशात रंगबेरंगी पंतग उडू लागतात. मकरसंक्रांतीनिमित्त पंतग उडवण्याची फार जूनी अणि प्रचलित परंपरा आहे. अबालवृद्धांना पतंगबाजीचे ...

मकर संक्रातीला शाहरुख खान उडवणार ‘पतंग’
ज नेवारीचा महिना येताच आकाशात रंगबेरंगी पंतग उडू लागतात. मकरसंक्रांतीनिमित्त पंतग उडवण्याची फार जूनी अणि प्रचलित परंपरा आहे. अबालवृद्धांना पतंगबाजीचे वेड असताना आपला किंग खान शाहरुख तरी कसा अपवाद राहू शकतो. यावर्षी तो त्याच्या घरी पहिल्यांदाच ‘पंतगबाजी महोत्सव’ आयोजित करणार असून सर्व कुटुंबियांसोबत पतंग उडवणार आहे.
दरवर्षी ईद आणि वाढदिवसाच्या दिवशी ‘मन्नत’ बंगल्याच्या गच्चीवर येऊन खाली जमलेल्या फॅन्सना अभिवादन करणारा शाहरुख आता १४ जानेवारी रोजी पंतग महोत्सवाच्या वेळीसुद्धा बाहेर येऊन चाहत्यांना भेटणार आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ईदप्रमाणेच शाहरुख यावर्षी मन्नतच्या गच्चीवर चाहत्यांसमवेत पतंग उडवण्याचा आनंद लुटणार आहे.
प्रथमच शाहरुख अशाप्रकारचा सोहळा साजरा करीत असून त्याची जोरदार तयारी सुरू असल्याचे सांगण्यात येतेय. समुद्रकिनारी असणारे त्याचे घर पतंग उडवण्यासाठी एकदम आदर्श जागा आहे. गच्चाीवरून विशाल समुद्राचा व्ह्युव पाहत जोराच्या वाऱ्या पंतग उडविण्याची मजाच काही और असेल! यावेळी त्याच्यासोबत काही जवळचे मित्रसुद्धा असणार आहेत.
शाहरुख आगामी ‘रईस’ चित्रपटाच्या प्रोमोशनमध्ये व्यस्त असून २५ जानेवारी रोजी तो प्रदर्शित होत आहे. त्याच दिवशी हृतिक रोशनचा ‘काबील’देखील रिलीज होत असल्यामुळे बिग बॉक्स आॅफिस टक्कर पाहायला मिळणार आहे. दोन्ही सुपरस्टारचे बिग बजेट चित्रपट एकाच दिवशी येत असल्यामुळे कोण बाजी मारणार याकडे सर्वांच लक्ष लागलेले आहे. विशेष म्हणजे गेल्या वर्षी हृतिकच्या ‘मोहेंजोदडो’ची अक्षय कुमारच्या ‘रुस्तम’शी टक्कर झाली होती ज्यामध्ये ‘रुस्तम’ने बाजी मारली.
राहुल ढोलकिया दिग्दर्शित ‘रईस’मध्ये पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खान आणि नवाजुद्दिन सिद्दीकी प्रमुख भूमिकेत असून शाहरुख रईस आलम या ऐंशीच्या दशकातील दारू स्मगलरच्या भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटातील ‘लैला मैं लैला’ या आयटम नंबरवर सनी लिओनी थिरकली आहे