थिएटरमध्ये नाचला चाहता; शाहरुख म्हणाला - Wow...मला सोडून लोक तुलाच पाहत असतील, लव्ह यू!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2023 07:36 PM2023-09-11T19:36:40+5:302023-09-11T19:38:17+5:30

किंग खानच्या जवान चित्रपटाने चाहत्यांना अगदी वेडं करुन सोडलं आहे. जिकडेतिकडे फक्त ‘जवान’चीच चर्चा पाहायला मिळत आहे.

Shah Rukh Khan reacts after fan dances to Zinda Banda during Jawan show | थिएटरमध्ये नाचला चाहता; शाहरुख म्हणाला - Wow...मला सोडून लोक तुलाच पाहत असतील, लव्ह यू!

Shahrukh Khan

googlenewsNext

नुकत्याच प्रदर्शित झालेल्या किंग खानच्या 'जवान' या चित्रपटाची क्रेझ भारतभरातील चाहत्यांमध्ये दिसून येत आहे. या चित्रपटाचे देशभरात हाऊसफुल्ल शो होत आहेत. चित्रपटातील गाण्यावर थिएटरमध्ये डान्स करत असलेल्या प्रेक्षकांचा व्हिडिओ विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत आहे. चाहते सुपरहिट ट्रॅकवर मोठ्या उत्साहात नाचताना दिसत आहेत. चाहत्यांमध्ये चित्रपटाची क्रेझ दिसून येत आहे. 

शाहरुखचा 'जबरा फॅन' असणाऱ्या एका चाहत्याने किंग खानचा लूक रीक्रिएट केला आणि थिएटरमध्येच जिंदा बंदा गाण्यावर डान्स केला. त्याचा हा व्हिडीओ सध्या व्हायरल होतोय. खुद्द शाहरुख खानने त्याचा व्हिडीओ रिट्विट केलाय. किंग खानने ट्विटमध्ये म्हटले की, "वाह.... चांगला डान्स केलास मित्रा. थिएटरमधील इतर प्रेक्षकही तुझ्यासोबत नाचले असतील. मला खात्री आहे की लोक मला सोडून तुलाच पाहत असतील.  लव्ह यू".


 

जवान रिलीज झाल्यापासून बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई करत आहे. जवानच्या स्टारकास्टबद्दल बोलायचे झाले तर या चित्रपटात शाहरुख खानसोबत नयनतारा, विजय सेतुपती, सान्या मल्होत्रा ​​आणि दीपिका पदुकोण आहेत.  प्रसिद्ध दाक्षिणात्य दिग्दर्शक अ‍ॅटली कुमारने जवानचे दिग्दर्शन केले आहे.  हिंदी, तमिळ, तेलुगु या भाषांमध्ये हा चित्रपट प्रदर्शित करण्यात आला आहे.

Web Title: Shah Rukh Khan reacts after fan dances to Zinda Banda during Jawan show

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.