'या' चित्रपटाचा ट्रेलर पाहून प्रभावित झाला शाहरुख खान, मित्राचं भरभरून केलं कौतुक!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2025 10:05 IST2025-07-01T10:03:22+5:302025-07-01T10:05:42+5:30
शाहरुख खाननं नुकताच एका खास चित्रपटाचा ट्रेलर पाहिला आणि तो पाहताच प्रभावित झाला.

'या' चित्रपटाचा ट्रेलर पाहून प्रभावित झाला शाहरुख खान, मित्राचं भरभरून केलं कौतुक!
Shah Rukh Khan: बॉलिवूडचा किंग खान अशी ओळख असलेला अभिनेता शाहरुख खान हा हिंदी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. त्याचे केवळ भारतातच नाही तर जगभरात असंख्य चाहते आहेत. शाहरुख केवळ अभिनेता म्हणूनच नाही, तर चांगल्या सिनेमा आणि कलेचा अस्सल जाणकार म्हणूनही ओळखला जातो. त्याने नुकताच एका खास चित्रपटाचा ट्रेलर पाहिला आणि तो पाहताच प्रभावित झाला. शाहरुखने या चित्रपटाचं भरभरून कौतुक केलं आहे. विशेष म्हणजे हा चित्रपट शाहरुखच्या जवळच्या व्यक्तीनं दिग्दर्शित केला असून त्यात अभिनयही केलाय.
हा चित्रपट म्हणजे अनुपम खेर दिग्दर्शित 'तन्वी द ग्रेट'. चार दशकांहून अधिक काळ अभिनय क्षेत्रात मोठं योगदान देणारे अनुपम खेर पुन्हा एकदा दिग्दर्शनाच्या मैदानात उतरले आहेत. या चित्रपटाचा ट्रेलर काल प्रदर्शित झाला आणि काही तासांतच त्यावर कौतुकाचा वर्षाव होऊ लागला.
शाहरुख खानने आपल्या X (ट्विटर) हँडलवर अनुपम खेरसाठी (Shah Rukh Khan Praised Tanvi The Great Trailer ) खास पोस्ट करत म्हटलं, "माझे मित्र अनुपम खेर जे नेहमीच जोखीम घेतात, मग अभिनय असो, चित्रपट निर्मिती असो किंवा आयुष्य असो. 'तन्वी द ग्रेट'चा ट्रेलर छान आहे. या प्रवासासाठी शुभेच्छा!", असं त्यानं म्हटलं.
To my friend @AnupamPKher who has always taken chances… whether it’s acting, filmmaking or life!! The trailer of #TanviTheGreat is looking awesome. All the best on this journey!! https://t.co/KPc7aHz0Sk
— Shah Rukh Khan (@iamsrk) June 30, 2025
'तन्वी द ग्रेट' हा एक भावनिक चित्रपट आहे. ही भूमिका शुभांगी दत्तनं साकारली असून अनुपम खेर तिच्या आजोबांच्या भूमिकेत आहेत. यासोबतच बोमन इराणी, जॅकी श्रॉफ, पल्लवी जोशी, अरविंद यांसारख्या कलाकारांच्याही या चित्रपटात महत्त्वाच्या भुमिका आहेत. येत्या १८ जुलै २०२५ रोजी 'तन्वी द ग्रेट' चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. शाहरुख खानसारख्या कलाकारानं केलेल्या कौतुकामुळे 'तन्वी द ग्रेट' पाहण्यासाठी चाहते उत्सुक झाले आहेत.