Pathaan Box Office Collection Day 1 Prediction: शाहरुख खानचा 'पठाण' पहिल्याच दिवशी एवढ्या कोटींचा करणार गल्ला! ट्रेड अ‍ॅनालिस्टने केला दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2023 07:14 PM2023-01-25T19:14:34+5:302023-01-25T19:46:26+5:30

बॉक्स ऑफिसवर चित्रपटाच्या पहिल्या दिवसाच्या कलेक्शनची बातमी समोर येत आहे.

Shah rukh khan pathaan box office collection day 1 prediction trade analyst clailms film collect 56 crore rupees | Pathaan Box Office Collection Day 1 Prediction: शाहरुख खानचा 'पठाण' पहिल्याच दिवशी एवढ्या कोटींचा करणार गल्ला! ट्रेड अ‍ॅनालिस्टने केला दावा

Pathaan Box Office Collection Day 1 Prediction: शाहरुख खानचा 'पठाण' पहिल्याच दिवशी एवढ्या कोटींचा करणार गल्ला! ट्रेड अ‍ॅनालिस्टने केला दावा

googlenewsNext

Pathaan Box Office Collection Day 1 Prediction: अखेर चाहत्यांची प्रतीक्षा संपली... चार वर्षांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर किंगखान शाहरूख खान (Shah Rukh Khan) मोठ्या पडद्यावर परतला आहे. २०२३ चा सर्वात मोठा सिनेमा ‘पठाण’ चित्रपटगृहांत रिलीज झाला आहे. दरम्यान, बॉक्स ऑफिसवर चित्रपटाच्या पहिल्या दिवसाच्या कलेक्शनची बातमी समोर येत आहे. ट्रेड अ‍ॅनालिस्टने दावा आहे की शाहरुख खानचा 'पठाण' पहिल्या दिवशी मोठी कमाई करू शकतो.

पहिल्या दिवशी 'पठाण' किती जमवणार गल्ला?
ट्रेड अ‍ॅनालिस्ट रोहित जयस्वाल यांनी ट्विट करून 'पठाण'च्या पहिल्या दिवसाच्या कमाईचा अंदाज लावला आहे. शाहरुख खानचा 'पठान' चित्रपट पहिल्या दिवशी 56 कोटींचा गल्ला जमवू शकतो, असे ट्विट त्यांनी केले. त्याचवेळी ट्रेड अ‍ॅनालिस्ट सुमित कडेल यांनी दावा केला की 'पठाण' पहिल्या दिवशी 50 कोटींच्या कलेक्शनच्या दिशेने वाटचाल करत आहे. मात्र, पठाण चित्रपटाने पहिल्या दिवशी किती कमाई केली, हे उद्या कळेल.

या सिनेमात शाहरुखशिवाय दीपिका पादुकोण, जॉन अब्राहम, आशुतोष राणा आणि डिंपल कपाडिया यांसारख्या स्टार्सनी काम केले आहे.‘पठाण’मध्ये शाहरूख रॉ एजंटच्या भूमिकेत आहे. देशाला वाचवण्यासाठी तो शत्रूंशी दोन हात करताना दिसतो.  चाहत्यांना ‘पठाण’ने वेड लावलं आहे.

फर्स्ट डे फर्स्ट शो पाहणारे चाहते ‘पठाण’चं कौतुक करताना थकत नाहीयेत. पठाणमध्ये सलमानच्या एंट्रीने चार चॉंद लावले आहेत. जवळपास २० मिनिटांचा कॅमिओ सलमानने यामध्ये केला आहे.याआधीही शाहरुख आणि सलमानने एकमेकांच्या चित्रपटात कॅमिओ केले आहेत. ट्युबलाईट, हर दिल जो प्यार करेगा, जीरो, हम तुम्हारे है सनम, कुछ कुछ होता है या सिनेमांमध्ये दोघंही एकत्र स्क्रीनवर आले आहेत.
 

Web Title: Shah rukh khan pathaan box office collection day 1 prediction trade analyst clailms film collect 56 crore rupees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.