Shah Rukh Khan: "...तेव्हा धोनीला खेळताना पाहून नाराज होतो", शाहरूख खानने दिलेल्या उत्तराची रंगली चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2022 19:11 IST2022-12-19T19:10:05+5:302022-12-19T19:11:11+5:30
MS Dhoni & Shahrukh Khan: शाहरूख खानने एका चाहत्याला भन्नाट उत्तर देऊन सर्वांचे लक्ष वेधले.

Shah Rukh Khan: "...तेव्हा धोनीला खेळताना पाहून नाराज होतो", शाहरूख खानने दिलेल्या उत्तराची रंगली चर्चा
नवी दिल्ली : आयपीएल 2023 चा मिनी लिलाव 23 डिसेंबर रोजी कोची येथे पार पडणार आहे. आयपीएल आपल्या आगामी हंगामाकडे कूच करत आहे. भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीची पुन्हा एकदा झलक पाहण्यासाठी चाहते आतुर आहेत. मात्र जेव्हा शाहरुख खानला धोनीबद्दल प्रश्न विचारण्यात आला तेव्हा शाहरुख खान म्हणाला की, जेव्हा धोनी फलंदाजीला येतो तेव्हा तो नाराज होतो. खरं तर शाहरुख खान सध्या 'पठाण' चित्रपटामुळे चर्चेत आहे. तो ट्विटरवर आपल्या चाहत्यांच्या प्रश्नांना उत्तर देत आहे.
शाहरूख खानचे भन्नाट उत्तर
बॉलिवूड अभिनेता शाहरूख खान त्याचा आगामी चित्रपट पठाणच्या प्रमोशनामध्ये व्यस्त आहे. मात्र तो ट्विटच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात राहत आहे. ट्विटर हँडलवरून तो #AskSRK ट्रेंड चालवून चाहत्यांच्या प्रश्नांना उत्तरे देत होता. या ट्रेंडमध्ये एका युजरने शाहरुख खानला विचारले की, कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध एमएस धोनी फलंदाजीसाठी क्रिजवर येतो तेव्हा तुला कसे वाटते? त्याच्या या चाहत्याला उत्तर देताना शाहरुखने मजेशीर उत्तर दिले. शाहरुख खान म्हणाला की "हा हा नाराज होतो."
Ha ha nervous https://t.co/HOpPh2DBjF
— Shah Rukh Khan (@iamsrk) December 17, 2022
एमएस धोनीची चेन्नई सुपर किंग्ज ही आयपीएलमधील सर्वात यशस्वी फ्रँचायझींपैकी एक आहे. चेन्नई सुपर किंग्जच्या संघाने चार वेळा आयपीएलचे विजेतेपद पटकावले आहे. 2021 मध्ये सुपर किंग्सने अंतिम फेरीत कोलकाता नाईट रायडर्सला पराभूत करून शेवटचे विजेतेपद पटकावले होते. खरं तर बॉलीवूड अभिनेता शाहरूख खान कोलकाता नाईट रायडर्स या फ्रँचायझीचा मालक आहे.
25 जानेवारीला रिलीज होणार 'पठाण'
शाहरुख खान आणि दीपिका पादुकोण यांची प्रमुख भूमिका असलेला 'पठाण' सिनेमा नववर्षात 25 जानेवारी रोजी प्रदर्शित होणार आहे. नुकतेच या सिनेमातील 'बेशरम रंग' गाणं प्रदर्शित झाले. यात दीपिकाचा हॉट अवतार पाहायला मिळत आहे. पण दीपिकाने या गाण्यात भगव्या रंगातील बिकीनीत दिसली आहे. यावरुनच सिनेमा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. चित्रपटावरून रंगलेल्या वादावर बोलताना शाहरूखने म्हटले, "जग काहीही असो फरक पडत नाही, आमच्यासारखे लोक सकारात्मक राहतील", असे शाहरूख खानने कोलकाता आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात म्हटले होते.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"