Shah Rukh khan: अखेर शाहरुख खानच्या बॉलिवूडमधील मोठ्या ब्रेकचं कारण आलं समोर, ही व्यक्ती आहे कारणीभूत

By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2022 10:51 AM2022-12-03T10:51:05+5:302022-12-03T10:51:31+5:30

Shah Rukh Khan: शाहरुख खान तब्बल ४ वर्षांनंतर चित्रपटांमध्ये पुनरागमन करणार आहे. शाहरुख 'पठाण' चित्रपटात मोठ्या कालावधीनंतर झळकणार आहे.

Shah Rukh Khan: Finally the reason behind Shahrukh Khan's big break in Bollywood has come out, this person is the reason | Shah Rukh khan: अखेर शाहरुख खानच्या बॉलिवूडमधील मोठ्या ब्रेकचं कारण आलं समोर, ही व्यक्ती आहे कारणीभूत

Shah Rukh khan: अखेर शाहरुख खानच्या बॉलिवूडमधील मोठ्या ब्रेकचं कारण आलं समोर, ही व्यक्ती आहे कारणीभूत

googlenewsNext

बॉलिवूडचा किंग खान शाहरुख (Shah Rukh khan) तब्बल ४ वर्षांच्या दीर्घ कालावधीनंतर बॉलिवूडमध्ये पुनरागमन करत आहे. त्याचवेळी त्यांची मुलगी सुहाना खान देखील पुढील वर्षी २०२३ मध्ये बॉलिवूडमध्ये प्रवेश करणार आहे. आता शाहरुख खानने सांगितले आहे की, सुहाना जेव्हा अमेरिकेत गेली तेव्हा तिने कोणतेही काम केले नाही. शाहरुखने सांगितले की, प्रत्यक्षात त्याला वाटले की सुहानाला एकटेपणा वाटेल आणि त्याला तिच्याकडे जावे लागेल.

सौदी अरेबियातील जेद्दाह येथे रेड सी इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलदरम्यान शाहरुख खानने या गोष्टीचा खुलासा केला.पुढच्या वर्षी जानेवारीत शाहरुख खानचा 'पठाण' चित्रपट रिलीज होत आहे आणि मुलगी सुहानाही झोया अख्तरच्या 'द आर्चीज' चित्रपटातून डेब्यू करणार आहे. सुहानाचा हा चित्रपट पुढील वर्षी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.


'डेडलाइन'सोबतच्या खास संवादात शाहरुख खान म्हणाला, 'तिने (सुहानाने) मला कधीही फोन केला नाही. मी अनेक चित्रपट साइनही केले नाहीत आणि विचार करत राहिलो की कदाचित ती फोन करेल, कदाचित ती येईल. मग शेवटी एके दिवशी मी तिला फोन केला आणि म्हणालो की ऐक, मी आता माझं काम सुरू करू का? मग तिने विचारले की तुम्ही काम का करत नाही आहात? मी म्हणालो की, मला वाटले की तुला न्यूयॉर्कमध्ये एकटेपणा वाटेल, म्हणून कदाचित तू मला कॉल करशील.'


चित्रपट अभ्यासासाठी सुहाना लंडनहून अमेरिकेत शिफ्ट झाली होती. सुहानाने 'द आर्चीज'साठी भरपूर शूटिंगही केले आहे आणि अलीकडेच ती दिवाळी पार्टीमध्ये अतिशय ग्लॅमरस स्टाईलमध्ये पाहायला मिळाली होती. तिला साडीत पाहून शाहरुख खानने विचारलेही की, तिने ती स्वतः नेसली आहे का? सुहानाने सांगितले होते की, आई गौरी खानने तिला साडी नेसण्यासाठी मदत केली होती.

Web Title: Shah Rukh Khan: Finally the reason behind Shahrukh Khan's big break in Bollywood has come out, this person is the reason

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.