का मारतोय शाहरुख दिल्लीतील डास? ‘रईस’ची टर उडवणारे जोक्स व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2016 13:34 IST2016-12-08T13:17:55+5:302016-12-08T13:34:24+5:30
काल शाहरुख खानचा बहुप्रतिक्षीत चित्रपट ‘रईस’चा ट्रेलर रिलीज करण्यात आला आणि त्याच्या चाहत्यांना आनंदाचे भरते आले. आपल्या लाडक्या किंग ...

का मारतोय शाहरुख दिल्लीतील डास? ‘रईस’ची टर उडवणारे जोक्स व्हायरल
पण ट्विटरवर कोणत्याही गोष्टीची टर उडवणे नित्याचे झाले आहे. ‘रईस’चा ट्रेलरपाहून काही ट्विपर्लसच्या विनोदबुद्धीतून असे काही भन्नाट जोक्स तयार झाले की, ते वाचून ट्रेलरपेक्षा जास्त मनोरंजन होते. असेच काही मजेशीर ट्विटस घेऊन आलोत खास तुमच्यासाठी.
* का मारतोय शाहरुख दिल्लीतील डास?
दिल्ली म्हणजे आपल्या देशाची राजधानी आणि शाहरुखचे मूळ गाव. त्यामुळे त्याला दिल्लीविषयी जरा जास्त प्रेम असणे स्वभाविक आहे. हेच कारण असावे की, शाहरुख तेथील लोकांचे आरोग्य सुरक्षित राहावे म्हणून डास मारत आहे, असा जर तुम्ही विचार करत असाल तर थांबा! एका ट्विटर यूजरने ‘रईस’मधील शाहरुखच्या फेसस एन्ट्रीला मॉर्फकरून त्याच्या हातामध्ये डास मारण्याचे फॉग मशीन देऊन कहरच केला. हे बघा -
SRK starts fogging drive to make Delhi mosquito free.
. pic.twitter.com/yK7whZsYNr— PhD in Bak*****!! (@Atheist_Krishna) 7 December 2016
* नोटबंदीनंतर असा दिसेल ‘रईस’
देशभरात सध्या नोटबंदीमुळे अनेक धनाढ्यांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे. शाहरुखही त्याला अपवाद नाही. नोटबंदीच्या निर्णयानंतर ‘रईस’ शाहरुख गरीब झाल्यावर असा दिसेल -
Raees before and after demonetization #RaeesTrailerpic.twitter.com/15tGxCrEN3— The Viral Fever (@TheViralFever) 7 December 2016
* शाहरुखची वानखेडेत एन्ट्री
काही वर्षांपूर्वी आयपीएल मॅचनंतर शाहरुख आणि मुंबईतील वानखेडे स्टेडियममधील एका सुरक्षारक्षकामध्ये बाचाबाची झाली होती. रागाचा पारा चढल्यामुळे त्याने सेक्युरिटी गार्डला शिवीगाळ केली होती. त्यानंतर शाहरुखवर वानखेड स्टेडियममध्ये येण्यास पाच वर्षांची बंदी घालण्यात आली होती. याचा राग म्हणून तो आता वानखेडेवर अशी एन्ट्री मारेल -
SRK entering Wankhede Stadium pic.twitter.com/MoNLJeEdTE— . (@The_Sleigher) 2 August 2015
* मुली के पराठे
शाहरुखच्या चेहऱ्यावर केजरीवालांचा चेहरा मॉर्फ करून ‘मुली के पराठे’ खाल्ल्यानंतर अशी हालत होते-
Baniye ka dimaag aur Kejribhai ki Farting.....
Jald aa raha hai Modi ji !!
. pic.twitter.com/TqmZabCdnn— PhD in Bak*****!! (@Atheist_Krishna) 7 December 2016
* ट्रेलर रिअॅक्शन
एवढ्या दिवसांपासून या चित्रपटाच्या ट्रेलरची वाट पाहणाऱ्या चाहत्यांपैकी ज्यांचा भ्रमनिरास झाला असेल त्यांच्या भावना पुढील फोटोतून स्पष्टपणे व्यक्त होतात.
Pic 1: Waiting for #RaeesTrailer
Pic 2: After watching #RaeesTrailer
. pic.twitter.com/AcagEBDRPZ— PhD in Bak*****!! (@Atheist_Krishna) 7 December 2016
* एटीएमच्या रांगेत उभा ‘रईस’
केजरीवाल मोंदीवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाही. म्हणून तर ११ वाजता लाँच होणारे ट्रेलर जेव्हा १२.३० वाजता रिलीज झाले तेव्हा ‘‘केजरीवाल’’ (खरेवाले नाही!) यांनी तक्रार केली की, शाहरुखला एटीएमच्या बाहेर रांगेत उभे राहावे लागल्यामुळे हा उशिर झाला. काय राव मोदीजी!
#RaeesTrailer Was Promised To Be Released At 11 am But Got Released At 12.30 pm Because SRK Got Late Standing In ATM Queue.Shame On Modiji.— Arvind Kejriwal (@TroluKejri) 7 December 2016
* व्यापार की व्यापम
चित्रपटात शाहरुख म्हणतो की, गुजरात की हवा में ही व्यापार हैं साहिब. यावर मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान काय उत्तर देतील? तुमचा काय अंदाज आहे? एका पठ्ठ्याने असा मजेशीर जोक तयार केला.
SRK: Gujarat ki hawa me Vyapar hai sahib
Shivraj Singh Chouhan: MP ki hawa me Vyapam hai sahib— PhD in Bak*****!! (@Atheist_Krishna) 7 December 2016