शाहरूख खानने रचला इतिहास!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2017 16:07 IST2017-04-28T10:37:23+5:302017-04-28T16:07:23+5:30

बॉलिवूडचा किंग शाहरूख खान याच्या नावावर एका आगळ्यावेगळ्या रेकॉर्डची नोंद करण्यात आली आहे. होय, शाहरूख ‘टेडटॉक शो’साठी कॅनडात भाषण ...

Shah Rukh Khan created history !! | शाहरूख खानने रचला इतिहास!!

शाहरूख खानने रचला इतिहास!!

लिवूडचा किंग शाहरूख खान याच्या नावावर एका आगळ्यावेगळ्या रेकॉर्डची नोंद करण्यात आली आहे. होय, शाहरूख ‘टेडटॉक शो’साठी कॅनडात भाषण देणारा पहिला भारतीय अभिनेता ठरला आहे. आपल्या भाषणात शाहरूखने हास्य, जोक्स आणि युक्तीच्या मदतीने आपले शब्द उपस्थितांपर्यंत पोहोचविले. 

गेल्या गुरुवारी शाहरूखने वॅँकूवर कॅनडा येथे भाषण देताना उपस्थिताना आश्चर्यचकीत केले. आपल्या भाषणात शाहरूखने स्वत:ला असा व्यक्ती संबोधले जो, स्वत:चे स्वप्न विकून कोट्यवधी लोकांना प्रेम देतो. शाहरूखने आपल्याच अंदाजात भाषण देताना म्हटले की, ‘मला हे कळून चुकले की, येथे उपस्थित असलेल्या बºयाचशा लोकांना माझे काम बघता आले नाही; ज्यामुळे मला दु:ख वाटत आहे’. 



पुढे बोलताना शाहरूखने म्हटले की, हे सत्य आहे की, मी पूर्णत: आत्मसन्मानित आहे, जसे एखाद्या फिल्म स्टारला असायला हवे. एक अभिनेता जो वयानुसार जगातील बदलांचा स्वीकार करीत असून, स्वत:ला या प्रवाहाबरोबर नेत असल्याचे त्याने म्हटले. वयाच्या १४व्या वर्षी मी माझ्या वडिलांना गमावून बसलो. तेव्हापासूनच स्वत:ला या जगात वावरण्यासाठी स्वत:ला परिपक्व करण्याचे मी धडे घेतले. सुरुवातीच्या काळात आयुष्य जगणे खूपच सोपे होते. मात्र सद्यस्थितीत जगताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. सुरुवातीला जगणे खूप सोपे होते, कारण जे हातात आले ते खात होतो अन् आयुष्य जगत होतो. मात्र आता आयुष्य जगताना कष्ट अन् संघर्षाशिवाय पर्याय नसल्याचेही शाहरूखने सांगितले. 



शाहरूखने त्याच्या आयुष्याचा प्रवास अतिशय रंजक पद्धतीने सांगितला. त्याने म्हटले की, माझ्या आयुष्याच्या प्रवासाची इतरांनी प्रेरणा घ्यावी याचा मी प्रयत्न केला. यावेळी त्याने मुंबईत कसा आलो अन् कामाचा शोध कसा घेतला याविषयी सांगितले. मी वयाच्या ४०व्या वर्षांपर्यंत वास्तवात जगत होतो. यादरम्यान मी ५० चित्रपट आणि २०० गाणी केले होते. यावेळी मला मलेशियाई लोकांनी सन्मानितही केले होते. फ्रान्स सरकारने सर्वोच्च नागरिक होण्याचा सन्मान दिला. मात्र मी कधीच माणुसकीला विसरलो नसल्याचे त्याने सांगितले. यावेळी शाहरूखने कॅनडाच्या लोकांना लुंगी डान्सही करायला लावला. किंग खानचे हे परिपक्व भाषण खरोखरच इतिहास निर्माण करणारे ठरले. 

Web Title: Shah Rukh Khan created history !!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.