'या' कारणामुळे शाहरुख खानने सलमान खानला दिली कार गिफ्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2017 17:46 IST2017-07-05T11:57:39+5:302017-07-05T17:46:35+5:30

बॉलिवूडमधले करण-अर्जुन अर्थात शाहरुख खान- सलमान खान. सध्या दोघांमधील मैत्री लोकांच्या चर्चेचा विषय बनली आहे. आपल्या मैत्री खातर शाहरुख ...

Shah Rukh Khan car gift to Salman Khan | 'या' कारणामुळे शाहरुख खानने सलमान खानला दिली कार गिफ्ट

'या' कारणामुळे शाहरुख खानने सलमान खानला दिली कार गिफ्ट

लिवूडमधले करण-अर्जुन अर्थात शाहरुख खान- सलमान खान. सध्या दोघांमधील मैत्री लोकांच्या चर्चेचा विषय बनली आहे. आपल्या मैत्री खातर शाहरुख खानने सलमानच्या ट्यूबलाईटमध्ये कॅमियो रोल केला होता. आता सलमान खान आनंद एल राय यांच्या आगामी चित्रपटात शाहरुख खानसोबत डान्स करणार आहे. मात्र आता यात एक नवा ट्विस्ट आला आहे. तुुम्ही विचार करता असे काहीही झालेले नाही पुन्हा या दोघांमध्ये कोणतेही भांडण झाले नाही आहे. तर दोघांच्या फॅन्ससाठी एक खूशखबर आहे. 
 
also read डान्स प्लस 3 मधील स्पर्धकांमधून सलमान खान करणार आपल्या सहनर्तकाची निवड


बॉलिवूड लाईफ या वेबसाईटच्या माहितीनुसार शाहरुख खानने सलमान खानला एक लग्जरी कार गिफ्ट म्हणून दिली आहे. ही कार गिफ्ट देण्यामागचे कारण सलमानने आपल्या बिझी शेड्यूलमधून वेळ काढून शाहरुखसोबत गाण्याचे शूटिंग केले म्हणून शाहरुखने सलमानला थॅक्स म्हणताना एक लग्जरी कार गिफ्ट दिली आहे. ज्यावेळी गाण्याच्या शूटिंगसाठी सलमान सेटवर आला त्यावेळी शाहरुख खानने त्याला सरप्राईज देते कार गिफ्ट केली. ही कार नुकतीच लाँच करण्यात आली आहे. सलमान गाडी बघून सरप्राईज झाला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शॉर्ट नोटिसवर सलमान खान आपल्या बिझी शेड्युलमधून वेळ काढून डान्ससाठी राजी झाला. सलमान सध्या कॅटरिनासोबत टायगर अभी जिंदा है च्या चित्रिकरणामध्ये बिझी आहे. तरीही चित्रपटात डान्स करण्यासाठी सलमानने तयार झाला. म्हणून किंगखानने त्याचे आभार मानण्यासाठी आणि आपले प्रेम व्यक्त करण्यासाठी ही कार गिफ्ट केली आहे. ट्यूबलाईटनंतर दोन्ही खानने एकत्र पडद्यावर बघण्यासाठी त्यांचे फॅन्स नक्कीच उत्सुक असतील. सलमान आणि शाहरुख खानमधले नाते नेहमीच लोकांच्या चर्चेचा विषय ठरले आहे. दोघांमधील मैत्री आणि भांडण दोन्ही गोष्टी गाजल्या आहेत.  

Web Title: Shah Rukh Khan car gift to Salman Khan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.