​‘हा’ चित्रपट ठरतोयं शाहरूख खान व करण जोहरच्या मतभेदाचे कारण!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2017 10:26 IST2017-10-15T04:56:05+5:302017-10-15T10:26:05+5:30

 शाहरूख खान व करण जोहरची मैत्री सगळ्यांनाच ठाऊक आहे. सगळ्या बॉलिवूडमध्ये त्यांची मैत्री फेमस आहे. पण आता एक वेगळीच ...

Shah Rukh Khan and Karan Johar are the reason for the debate! | ​‘हा’ चित्रपट ठरतोयं शाहरूख खान व करण जोहरच्या मतभेदाचे कारण!

​‘हा’ चित्रपट ठरतोयं शाहरूख खान व करण जोहरच्या मतभेदाचे कारण!

 
ाहरूख खान व करण जोहरची मैत्री सगळ्यांनाच ठाऊक आहे. सगळ्या बॉलिवूडमध्ये त्यांची मैत्री फेमस आहे. पण आता एक वेगळीच बातमी कानावर आलीय. होय, शाहरूख व करणच्या मैत्रीत दरी निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे, मैत्रीत निर्माण झालेल्या मतभेदाचे कारण दुसरे तिसरे काहीही नसून एक चित्रपट आहे. होय, ‘इत्तेफाक’ हा आगामी चित्रपट.
सिद्धार्थ मल्होत्रा, सोनाक्षी सिन्हा आणि अक्षय खन्ना स्टार ‘इत्तेफाक’ हा चित्रपट येत्या ३ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीस येतो आहे. याच चित्रपटावरून करण व शाहरूख यांच्या मतभेद निर्माण झाले आहेत. करण जोहर (धर्मा प्रॉडक्शन) आणि शाहरूख (रेड चिलीज प्रॉडक्शन) मिळून हा चित्रपट प्रोड्यूस करताहेत. पण रिलीज डेट इतक्या जवळ येवूनही अद्याप या चित्रपटाचे प्रमोशन सुरु झालेले नाही. खरे तर करणच्या कुठल्याही चित्रपटाचे प्रमोशन अगदी जबरदस्त असते. असे असताना ‘इत्तेफाक’च्या प्रमोशनला इतका उशीर का, असा प्रश्न सगळ्यांना पडला आहे. शाहरूखलाही नेमका हाच प्रश्न पडला आहे.

चर्चा खरी मानाल तर, करणच्या या अशा वागण्यामुळे शाहरूख नाराज झाला आहे आणि यामुळे दोघांमध्येही दुरावा निर्माण झाला आहे. करणला ‘इत्तेफाक’चे फार प्रमोशन करायचे नाही. कारण यामुळे क्लायमॅक्स लीक होण्याची भीती त्याला वाटते आहे. करणच्या मते, केवळ आणि केवळ क्लायमॅक्सवरच या चित्रपटाचे भविष्य टिकलेले आहे. त्यामुळे करण या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये फार इंटरेस्टेड नाही. याऊलट शाहरूख आक्रमक प्रमोशनच्या मताचा आहे. हेच त्यांच्यातील मतभेदांचे मुख्य कारण ठरले आहे.
यापूर्वीही शाहरूख व करण यांच्यात मतभेद निर्माण झाले होते. करणने खुद्द आपल्या आत्मचरित्रात ही बाब नमूद केली होती. शाहरूख व माझ्या मैत्रीत अनेक चढऊतार आलेत. शाहरूख मैत्रीच्या बाबतीत खूपच पजेसिव्ह आहे. मी त्याच्याशिवाय चित्रपट काढला की, तो दुखावतो. आमच्यात अनेकदा मतभेद निर्माण झालेत. पण ते फार काळ टिकले नाहीत. मैत्रीचा पाया मजबूत असेल तर मैत्री कधीच संपत नाही, असे करणने म्हटले होते. यावेळीही हीच अपेक्षा करू या.

ALSO READ : ​रोहित शेट्टी बहकला अन् म्हणून फ्लॉप झाला शाहरूख खान - काजोलचा ‘दिलवाले’ ! 

Web Title: Shah Rukh Khan and Karan Johar are the reason for the debate!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.