Shah Rukh Khan : 'पठान'नंतर शाहरूख खानच्या 'जवान'नंही रिलीज आधीच कमावले इतके कोटी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2023 11:05 AM2023-07-01T11:05:56+5:302023-07-01T11:06:54+5:30

Jawan Movie : शाहरुख खान, नयनतारा आणि विजय सेतुपती यांचा आगामी 'जवान' या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. हा चित्रपट ७ सप्टेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Shah Rukh Khan: After 'Pathan', Shah Rukh Khan's 'Jawaan' has already earned so many crores. | Shah Rukh Khan : 'पठान'नंतर शाहरूख खानच्या 'जवान'नंही रिलीज आधीच कमावले इतके कोटी

Shah Rukh Khan : 'पठान'नंतर शाहरूख खानच्या 'जवान'नंही रिलीज आधीच कमावले इतके कोटी

googlenewsNext

शाहरुख खान (Shahrukh Khan), नयनतारा (Nayantara) आणि विजय सेतुपती (Vijay Sethupati) यांच्या आगामी 'जवान' (Jawan) या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. हा चित्रपट ७ सप्टेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच कमाईचा विक्रम करत आहे. या चित्रपटाचे संगीत करोडोंमध्ये विकले गेल्याचे वृत्त आहे. रिपोर्ट्सनुसार, टी-सीरीजने जवानचे म्युझिक ३६ कोटी रुपयांना विकत घेतले आहे. अशा परिस्थितीत पठाणनंतर शाहरुख खान बॉक्स ऑफिसवर पुन्हा एकदा धुमाकूळ घालणार असल्याचं दिसत आहे.

boxofficeworldwide.com च्या रिपोर्टनुसार, 'जवान'चे म्युझिक राइट्स म्युझिक लेबल टी-सीरीजने ३६ कोटींना विकत घेतले आहेत. याबाबत बॉलिवूड लाइफच्या वृत्तानुसार, या चित्रपटाचे संगीत हक्क विकत घेण्यासाठी अनेक कंपन्यांमध्ये मोठी स्पर्धा होती, मात्र अखेर भूषण कुमारच्या टी-सीरीजने बाजी मारली आहे. रिपोर्टनुसार असे म्हटले आहे की हा एक विक्रमी करार आहे जो यापूर्वी कधीही पाहिला गेला नाही. आता या दाव्यांवर विश्वास ठेवला तर, चित्रपटाने प्रदर्शनापूर्वीच बजेटच्या निम्मी कमाई केली आहे.

या कारणासाठी जवान आहे खास
शाहरुख खानचा हा आगामी चित्रपट अनेक अर्थाने खास आहे. पहिली गोष्ट म्हणजे शाहरुख खान या चित्रपटात साऊथ स्टार नयनतारासोबत रोमान्स करणार आहे. यासोबतच तो पडद्यावर थेट विजय सेतुपतीशी भिडणार आहे. त्याचबरोबर या चित्रपटाचे दिग्दर्शक एटली कुमार पहिल्यांदाच शाहरुख खानसोबत एका मोठ्या प्रोजेक्टवर काम करत आहेत. हा चित्रपट घोषणेपासून चर्चेत आहे.

शाहरूख खानचं दमदार कमबॅक
'जवान' हा एक अॅक्शन थ्रिलर चित्रपट आहे हे सर्वांनाच माहीत आहे. या चित्रपटात शाहरुख जबरदस्त अॅक्शन करताना दिसणार आहे. याआधी शाहरुख खानचा थ्रिलर सस्पेन्स चित्रपट 'पठाण' देखील लोकांना आवडला होता. याचे दिग्दर्शन सिद्धार्थ आनंद यांनी केले होते. या चित्रपटाने जगभरात १०५३ कोटी रुपयांचे कलेक्शन केले होते. 'पठाण'च्या माध्यमातून शाहरुख खानने तब्बल ४ वर्षांनी बॉलिवूडमध्ये पुनरागमन करत प्रेक्षकांना भुरळ घातली.

आगामी प्रोजेक्ट...
'जवान' चित्रपटानंतर शाहरुख खान 'डंकी' चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात तो अभिनेत्री तापसी पन्नूसोबत रोमान्स करणार आहे. 

Web Title: Shah Rukh Khan: After 'Pathan', Shah Rukh Khan's 'Jawaan' has already earned so many crores.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.