‘हॅप्पी न्यू ईअर’ साठी शाहरूख नाचला होता लग्नात?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2016 16:41 IST2016-12-09T16:41:07+5:302016-12-09T16:41:07+5:30

‘बॉलिवूडचा बादशाह’ शाहरूख खान हा त्याच्या मिश्किल स्वभावासाठी ओळखला जातो. त्याचा हा मिश्किल स्वभाव ‘रईस’ ट्रेलर लाँचप्रसंगी सर्वांसमोर आला. ...

Shah Rukh danced to 'Happy New Year'? | ‘हॅप्पी न्यू ईअर’ साठी शाहरूख नाचला होता लग्नात?

‘हॅप्पी न्यू ईअर’ साठी शाहरूख नाचला होता लग्नात?

ॉलिवूडचा बादशाह’ शाहरूख खान हा त्याच्या मिश्किल स्वभावासाठी ओळखला जातो. त्याचा हा मिश्किल स्वभाव ‘रईस’ ट्रेलर लाँचप्रसंगी सर्वांसमोर आला. माध्यमांसोबत त्याने ‘हॅप्पी न्यू ईअर’ चित्रपटावेळचा फनी किस्सा शेअर केला. तो  म्हणाला,‘ हॅप्पी न्यू ईअरचे शूटिंग सुरू असताना पैशांसाठी मी एका लग्नात नाचलो होतो. पैसा इतना जरूरी होता हैं’ असे बोलत पुन्हा त्याने मिश्किलपणे हसायला सुरू केले. 

दिग्दर्शक राहुल ढोलकिया याच्या ‘रईस’ चित्रपटाचा ट्रेलर नुकताच लाँच करण्यात आला. चित्रपटात ग्रे शेड मध्ये शाहरूख खानची भूमिका आहे. चित्रपटाचा ट्रेलर एंटरटेन्मेंट, अ‍ॅक्शन, थ्रिलरमिश्रित व सत्य कथेवर आधारित  आहे. ट्रेलर लाँच सोहळ्याप्रसंगी पुढे शाहरूख म्हणाला,‘नफा-तोटा या दोन बाबी आता आमच्या आयुष्याचा खूप महत्त्वाचा भाग बनल्या आहेत. असं नाही की, मी खूप ‘रिच’ (श्रीमंत) आहे. पण, तरीही  मी माझ्या चित्रपटाचं नाव ‘रईस’ ठेवलं. जर मला तोटा झाला असता तर मला माझ्या चित्रपटाचं नाव ‘गरीब’ ठेवावं लागलं असतं. (पुन्हा मिश्किलपणे हसत) 

‘रईस’ मध्ये पाकिस्तानी कलाकार माहिरा खान असल्याने चित्रपट मध्यंतरी वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. महाराष्ट्रातून चित्रपटाच्या प्रदर्शनाला विरोध झाला होता. नुकताच चित्रपटाचा ट्रेलर लाँच करण्यात आला. काही क्षणातच ट्रेलरला लाखो लाईक्स मिळाले. वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या या चित्रपटाला आता रिलीज झाल्यानंतर प्रेक्षकांचा कसा प्रतिसाद मिळतो, हे लवकरच कळेल.

Web Title: Shah Rukh danced to 'Happy New Year'?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.