​भन्साळींच्या सिनेमात दिसणार शाहरूख-कंगना?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2016 19:36 IST2016-08-23T14:06:57+5:302016-08-23T19:36:57+5:30

काहीसे उशीरा का होईना, पण अलीकडे मोठ्या पडद्यावर  काही ‘ब्रँड न्यू’ जोड्या पाहायला मिळाल्या. लवकरच ‘बार बार देखो’मध्ये सिद्धार्थ ...

Shah Rukh and Kangana? | ​भन्साळींच्या सिनेमात दिसणार शाहरूख-कंगना?

​भन्साळींच्या सिनेमात दिसणार शाहरूख-कंगना?

हीसे उशीरा का होईना, पण अलीकडे मोठ्या पडद्यावर  काही ‘ब्रँड न्यू’ जोड्या पाहायला मिळाल्या. लवकरच ‘बार बार देखो’मध्ये सिद्धार्थ मल्होत्रा आणि कॅटरिना कैफ ही जोडी दिसणार आहे. त्यापूर्वी ‘सुल्तान’मध्ये  अनुष्का शर्मा व सलमान खान ही जोडी पहिल्यांदा एकत्र आली. ताज्या माहितीनुसार, आगामी काळात अशीच एक ‘ब्रँड न्यू’ जोडी आणि त्यांची केमिस्ट्री प्रेक्षकांना पाहायला मिळू शकते. होय, दुसरा तिसरा कुणी नाही तर किंग खान शाहरूख खान आणि कंगना राणौत ही जोडी आपल्याला मोठ्या पडद्यावर पाहायला मिळू शकते. तेही संजय लीला भन्साळी यांच्या चित्रपटात. भन्साळींनी त्यांचा ड्रिम प्रोजेक्ट ‘पद्मावती’ हाती घेतला आहे. पण यासोबतच आणखी एका चित्रपटावर त्यांचे काम सुरु आहे आणि या चित्रपटात शाहरूख आणि कंगना ही फ्रेश जोडी एकत्र आणण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. अर्थात याबाबत भन्साळींनी अद्याप कुठलीही घोषणा केलेली नाही. पण भन्साळींच्या चित्रपटात शाहरूख-कंगनाची जोडी म्हणजे प्रेक्षकांसाठी ‘डबल ट्रिट’ ठरेल, एवढे नक्की!!

Web Title: Shah Rukh and Kangana?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.