शबाना आझमी म्हणतात, आताच्या सिनेमांमध्ये अभिनेत्री सती-सावित्री नव्हे, तर बोल्ड अंदाजात झळकतात
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2017 14:12 IST2017-02-05T08:14:35+5:302017-02-05T14:12:26+5:30
नुकतेच लॅक्मे फॅशन वीकमध्ये रॅम्पवर झळकलेल्या प्रसिद्ध अभिनेत्री शबाना आझमी यांनी आताच्या सिनेमांमधील अभिनेत्रीच्या बोल्ड अवतारावर भाष्य केले आहे. ...
.jpg)
शबाना आझमी म्हणतात, आताच्या सिनेमांमध्ये अभिनेत्री सती-सावित्री नव्हे, तर बोल्ड अंदाजात झळकतात
न कतेच लॅक्मे फॅशन वीकमध्ये रॅम्पवर झळकलेल्या प्रसिद्ध अभिनेत्री शबाना आझमी यांनी आताच्या सिनेमांमधील अभिनेत्रीच्या बोल्ड अवतारावर भाष्य केले आहे. वास्तविक एकेकाळी बोल्ड सिनेमांमध्ये स्वत:च्या सौंदर्याची जादू दाखविणाºया शबाना आझमींचे हे वक्तव्य आश्चर्य व्यक्त करणारे असले तरी, त्यांचा याकडे बघण्याचा सकारात्मक दृष्टिकोन दिलासा देणाराच म्हणावा लागेल.
जेव्हा शबाना आझमी यांना सिनेमाचे रूप बदलविण्यासाठी काय योगदान देणे गरजेचे आहे, असे विचारण्यात आले तेव्हा त्यांनी म्हटले की, मला असे वाटतेय की सध्याच्या सिनेमात बरेचसे बदल घडत आहेत. सुरुवातीच्या काळात अभिनेत्रींना सिनेमामध्ये सती-सावित्रीच्या रूपात सरळ-सभ्य अन् भोळसट दाखविले जात होते. मात्र अलीकडच्या सिनेमांमध्ये हे चित्रण पूर्णत: बदलले आहे. बोल्ड आणि सेक्सी अवतारातील अभिनेत्री सध्या सर्व सिनेमाचे सूत्र हाती घेत आहेत. मात्र या बदलाकडे मी सकारात्मकतेने बघत असल्याचेही त्यांनी म्हटले.
![]()
राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या ६६ वर्षीय अभिनेत्रीने यावेळी विद्या बालन आणि आलिया भट्ट या अभिनेत्रींचे कौतुकही केले. त्यांनी म्हटले की, जर आताच्या अभिनेत्रींच्या कामगिरींचा आढावा घेतल्यास जसे की, विद्या बालन अभिनित सिनेमे व युवा अभिनेत्री आलिया भट्ट हिची वाटचाल ही कौतुकास्पद आहे. मात्र मला असे वाटतेय की, हा बदल पुरेसा नाही अजून बराचसा पल्ला गाठणे आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले.
शबाना आझमी नुकत्याच ‘नीरजा’ या सिनेमात सोनम कपूरच्या आईच्या भूमिकेत झळकल्या होत्या. नवी दिल्ली येथे पार पडलेल्या लॅक्मे फॅशन वीकच्या समर / रिसॉर्ट २०१७ मध्ये क्रांती या सामाजिक संस्थेने आयोजित केलेल्या शोला समर्थन देण्यासाठी त्या उपस्थित होत्या. या शोमध्ये रेड लाइट एरियामधून सुरक्षित बाहेर काढण्यात आलेल्या मुलींनी रॅम्प वॉक केला. हा शो संपल्यानंतर त्यांनी न्यूज एजंसीशी बोलताना याबाबतचे वक्तव्य केले. त्याचबरोबर क्रांती या सामाजिक संस्थेचेही कौतुक केले. या संस्थेकडून खºया अर्थाने क्रांतिकारी काम केले जात आहे. ज्या लोकांना समाजातून बहिष्कृत केले गेले अशा लोकांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे काम या संस्थेकडून केले जात असल्याचे त्यांनी सांगितले.