शबाना आझमींनी करिनाला सुनावले खडे बोल
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2016 09:54 IST2016-03-10T16:54:35+5:302016-03-10T09:54:35+5:30
कुठल्याही मुद्यावर परखड बोलणारी अभिनेत्री अशी शबाना आझमी यांची ओळख आहे. आज गुरुवारी एका कार्यक्रमात याचा पुन्हा एकदा प्रत्यय ...
.jpg)
शबाना आझमींनी करिनाला सुनावले खडे बोल
क ठल्याही मुद्यावर परखड बोलणारी अभिनेत्री अशी शबाना आझमी यांची ओळख आहे. आज गुरुवारी एका कार्यक्रमात याचा पुन्हा एकदा प्रत्यय आला. या कार्यक्रमात बोलताना शबाना यांनी अनेक मुद्यांवर आपली परखड मते मांडली. यात एक मुद्दा होता आयटम साँगचा. चित्रपटातील आयटम साँगला जाहीर विरोध नोंदवत शबानांनी अप्रत्यक्षपणे करिनाला खडे बोल सुनावले. मी आयटम नंबरच्या विरोधात आहे. कारण एखादी टॉप मोस्ट अभिनेत्री जेव्हा केव्ही ‘मैे तंदूरी मुर्गी हूं यार, गटका ले सईया एल्कोहल से..’ अशा गाण्यावर नाचते तेव्हा ती निश्चितपणे हसण्यावारी नेण्याची बाब नसते. ती एक गंभीर बाब ठरते. एक जण असे गीत लिहितो, काही लोक ते बनवतात आणि कोट्यवधी लोक ते बघतात. या बघणाºयांमध्ये लहान मुलेही असतात. अशावेळी तुम्ही कुठल्या गाण्यावर नाचता, हे पाहणे निश्चितपणे तुमची जबाबदारी आहे, अशा शब्दांत शबानांनी करिनाला लक्ष्य केले. ‘दबंग २’मध्ये करिनाचे ‘फेविकोल से’ हे आयटम साँग चांगलेच लोकप्रीय झाले होते.