‘सेक्स पुरुषांसाठी मजा, महिलांसाठी मात्र गुन्हा’, कंगना राणौतचे पुन्हा वादग्रस्त वक्तव्य!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2017 19:34 IST2017-09-19T14:04:05+5:302017-09-19T19:34:05+5:30

बॉलिवूडची क्वीन कंगना राणौत सध्या तिच्या बेताल वक्तव्यांमुळे चांगलीच चर्चेत राहत आहे. बॉलिवूडमधील ‘भाई-भतिजा वाद’ असो वा महिलांप्रती पुरुषांची ...

'Sex is fun for men, but crime for women', Kangana Ranaout again controversial statement! | ‘सेक्स पुरुषांसाठी मजा, महिलांसाठी मात्र गुन्हा’, कंगना राणौतचे पुन्हा वादग्रस्त वक्तव्य!

‘सेक्स पुरुषांसाठी मजा, महिलांसाठी मात्र गुन्हा’, कंगना राणौतचे पुन्हा वादग्रस्त वक्तव्य!

लिवूडची क्वीन कंगना राणौत सध्या तिच्या बेताल वक्तव्यांमुळे चांगलीच चर्चेत राहत आहे. बॉलिवूडमधील ‘भाई-भतिजा वाद’ असो वा महिलांप्रती पुरुषांची असलेली मानसिकता असो या सर्वच मुद्द्यांवर कंगना वक्तव्य करून खळबळ उडवून देत आहे. कंगनाने काही दिवसांपूर्वीच एका वृत्तवाहिणीच्या शोमध्ये मुलाखत देताना इंडस्ट्रीतील अनेक बड्या स्टार्सवर हल्लोबोल केला होता. ज्यामुळे ती चांगलीच चर्चेत राहिली. आता पुन्हा एकदा कंगनाने असेच काहीसे वादग्रस्त वक्तव्य करून एकप्रकारे वाद ओढवून घेतला आहे. कंगनाने म्हटले की, ‘बºयाचशा अशा गोष्टी आहेत, ज्या पुरुषांसाठी सामान्य आहेत. मात्र त्याच गोष्टी जर महिलांनी केल्या तर त्यांच्याकडे घृणास्पदरीत्या बघितले जाते. 

यावेळेस कंगनाने बॉलिवूडमध्ये असलेल्या पुरुषप्रधान संस्कृतीवर वॉर केला आहे. कंगनाने म्हटले की, मी काही पुरुषांच्या विरोधात नाही, परंतु जर कोणी मला फेमिनिस्ट म्हटले तर ते कदाचित खरे असावे.’ कंगनाने सेक्सुुअल लाइफविषयी बोलताना म्हटले की, ‘सेक्स करणे पुरुषांसाठी मजा आहे, परंतु महिलांसाठी गुन्हा आहे.’ कंगनाने तिचे हे मत ग्लॅमर जगतातील एक कडवे सत्य असल्याशी जोडले आहे. कंगनाने पुढे बोलताना म्हटले की, ‘इंडस्ट्रीमधील पुरुषांची अशी अपेक्षा आहे की, त्यांच्या मुलांनी कॅसोनोवा बनावे. परंतु मुलींनी बिकिनीदेखील परिधान करू नये.’

कंगनाचा ‘सिमरन’ हा चित्रपट रिलीज झाला असून, त्यास चाहत्यांचा जेमतेम प्रतिसाद मिळत आहे. मात्र अशातही कंगना खूश आहे. वास्तविक बॉक्स आॅफिस रिपोर्टचा विचार केल्यास कंगनाचा हा चित्रपट कमाईच्या बाबतीत फारसा यशस्वी होताना दिसत नाही. ज्या पद्धतीने चित्रपटाकडून अपेक्षा व्यक्त केली जात होती, त्यापद्धतीने चित्रपट कमाई करण्यात अपयशी ठरत आहे. असो, आता कंगनाच्या या नव्या वादावर कोणी प्रतिक्रिया देईल काय? हे बघणे मजेशीर ठरेल. 

Web Title: 'Sex is fun for men, but crime for women', Kangana Ranaout again controversial statement!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.