‘मन्नत’ मध्ये शाहरूख उभारतोय नवे किचन

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2017 17:44 IST2017-01-03T17:44:39+5:302017-01-03T17:44:39+5:30

‘दिवाना’ चित्रपटामुळे बॉलिवूडला किंग खान शाहरूख मिळाला. त्याचा अभिनय, आवाज, व्यक्तिमत्व हे सर्वांनाच प्रभावित करणारं असतं. त्याच्यावर वेड्यासारखं प्रेम ...

Seven new kitchens are set up in 'Mannat' | ‘मन्नत’ मध्ये शाहरूख उभारतोय नवे किचन

‘मन्नत’ मध्ये शाहरूख उभारतोय नवे किचन

िवाना’ चित्रपटामुळे बॉलिवूडला किंग खान शाहरूख मिळाला. त्याचा अभिनय, आवाज, व्यक्तिमत्व हे सर्वांनाच प्रभावित करणारं असतं. त्याच्यावर वेड्यासारखं प्रेम करणारा चाहता वर्ग त्याने कमावला. एक अष्टपैलू व्यक्तीमत्त्व म्हणून त्यानं नावलौकिक केला. पण, तुम्हाला हे माहितीये का तो एक उत्तम अभिनेता तर आहेच पण तो एक चांगला कुक देखील आहे. त्याची कुकिंग स्कील आणखी सुधारण्यासाठी त्याने त्याच्या ‘मन्नत’ या घरी एक नवे किचन उभारण्याचा निर्णय घेतलाय. त्याने ही माहिती सोशल मीडियावर त्याच्या चाहत्यांसोबत शेअर केली आहे. 

                           
                           इटालियन खाद्यपदार्थ शिकताना शाहरूख खान.

याविषयी अधिक माहिती देताना तो म्हणतो,‘ माझ्या कुटुंबातील सदस्य हे रेस्टॉरंटमध्ये जेवण करण्यासाठी जातात. पण, मला असं वाटतं की, घरचं जेवणच आरोग्यासाठी चांगलं असतं. म्हणून मी आता इटालियन खाद्य बनवायला शिकत आहे. मी आता पास्ता, रिसोटो आणि तिरामिसू हे पदार्थ बनवू शकतो. पण, यासर्वांपलीकडे मला सर्वांना त्यांचं पोट भरेपर्यंत वाढायला प्रचंड आवडतं.’ तसेच त्याने संगीत शिकायचेही मनावर घेतलंय म्हणे. त्याने दोन महागडे गिटार विकत घेतले आहेत. एक त्याच्यासाठी आणि दुसरे त्याचा मुलगा आर्यन साठी. तो म्हणतो, ‘जर आम्ही तिघेही गिटार शिकलो तर  घरचेच ‘बॉयबँण्ड’ तयार होईल, नाही का?’ 

२०१७ या वर्षात प्रत्येकजण नवीन काहीतरी शिकण्याचा संकल्प करतात. शाहरूखने त्याचे कुकिंग स्कील आणि आर्ट स्कील सुधारण्याचा संकल्प केलेला दिसतोय. ‘रईस’ या आगामी चित्रपटामुळे शाहरूख खान सध्या चर्चेत आहे. पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खान हिच्यामुळे चित्रपट वांद्यात आहे. पाहूयात, चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर कसा प्रतिसाद मिळतोय ते...!

Web Title: Seven new kitchens are set up in 'Mannat'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.