मनोज वाजपेयीच्या 'द फॅमिली मॅन'चा सीक्वल येणार लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

By तेजल गावडे | Updated: September 22, 2020 17:12 IST2020-09-22T17:11:20+5:302020-09-22T17:12:02+5:30

मनोज वाजपेयी अभिनीत वेबसीरिज 'द फॅमिली मॅन २'ची घोषणा नुकतीच करण्यात आली आहे.

The sequel of Manoj Vajpayee's 'The Family Man' will be released soon | मनोज वाजपेयीच्या 'द फॅमिली मॅन'चा सीक्वल येणार लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

मनोज वाजपेयीच्या 'द फॅमिली मॅन'चा सीक्वल येणार लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

बॉलिवूड अभिनेता मनोज वाजपेयीच्या द फॅमिली मॅन या वेबसीरिजला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला. या सीरिजच्या दुसऱ्या सीझनची प्रेक्षक उत्सुकतेने वाट पाहत आहेत. नुकतेच आता या वेबसीरिजला एक वर्षे पूर्ण झाले आहेत. या निमित्ताने द फॅमिली मॅनच्या निर्मात्यांनी दुसऱ्या सीझनची दमदार अंदाजात घोषणा केली आहे. इंटरेस्टिंग बाब म्हणजे दुसऱ्या सीझनमध्ये अभिनेत्री समांथा अक्किनेनीदेखील मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने ती डिजिटल माध्यमात पदार्पण करणार आहे. 


द फॅमिली मॅन या सीरिजला एक वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने निर्मात्यानी व्हिडिओ शेअर करत दुसऱ्या सीझनची घोषणा केली आहे.


मनोज वाजपेयीने द फॅमिली मॅनच्या दुसऱ्या सीझनच्या डबिंगला सुरूवात केली आहे. ही माहिती खुद्द मनोज वाजपेयीने सोशल मीडियावर दिली आहे. त्याने एक फोटो शेअर केला आहे. ज्यात तो डबिंग करताना दिसतो आहे. फोटो शेअर करत मनोज वाजपेयीने कॅप्शनमध्ये लिहिले की, द फॅमिली मॅन २ साठी डबिंग.


द फॅमिली मॅन वेबसीरिजमधून मनोज वाजपेयीने डिजिटल माध्यमात पदार्पण केले होते. यात त्याने श्रीकांत तिवारीची भूमिका साकारली आहे, जो एक सीक्रेट एजेंट आहे. यात त्याच्यासोबत शरीब हाश्मी आणि प्रियामणी हे कलाकार आहेत. पहिल्या सीझनला मिळालेल्या चांगल्या प्रतिसादानंतर आता चाहते दुसऱ्या सीझनची औत्सुकतेने वाट पाहत आहेत.

Web Title: The sequel of Manoj Vajpayee's 'The Family Man' will be released soon