​बांगलादेशी हिरो आलोम बोगराने शेअर केली शाहरूख खानसोबत सेल्फी; मग झाले असे काही!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2017 12:09 IST2017-07-26T06:39:27+5:302017-07-26T12:09:27+5:30

शाहरूख खानसोबत सेल्फी काढण्याचा मोह कुणाला होणार नाही? किंगखानसोबत सेल्फी काढण्यासाठी चाहते अक्षरश: वेडे आहेत. अशात शाहरूखच्या बंगल्यात म्हणजेच ...

Selfie with Shah Rukh Khan shared with Bangladeshi Hero Allaar Bogar; Then something happened !! | ​बांगलादेशी हिरो आलोम बोगराने शेअर केली शाहरूख खानसोबत सेल्फी; मग झाले असे काही!!

​बांगलादेशी हिरो आलोम बोगराने शेअर केली शाहरूख खानसोबत सेल्फी; मग झाले असे काही!!

हरूख खानसोबत सेल्फी काढण्याचा मोह कुणाला होणार नाही? किंगखानसोबत सेल्फी काढण्यासाठी चाहते अक्षरश: वेडे आहेत. अशात शाहरूखच्या बंगल्यात म्हणजेच ‘मन्नत’वर जावून सेल्फी काढायला मिळाली, म्हणजे लॉटरीच लागली समजायची. सध्या अशीच एक सेल्फी वेगाने व्हायरल होत आहे.
होय, ‘मन्नत’ बाहेर जमलेल्या शेकडो लोकांच्या गर्दीसोबत शाहरूख खान सेल्फी घेतांनाचा हा फोटो आहे आणि यात शाहरूखच्या बाजूला एक व्यक्ती उभी आहे. या व्यक्तीला तुम्ही ओळखत असालच. होय, ही व्यक्ती म्हणजे, बांगलादेशचा स्टार अभिनेता आलोम बोगरा आहे. भारतात शाहरूखसाठी लोक वेडे आहेत तर तिकडे बांगलादेशात आलोमसाठी. सोशल मीडियावर प्रचंड लोकप्रीय असलेला आलोम आपल्या वेगळ्या अंदाजासाठी प्रसिद्ध आहे. आलोम शाहरूखसारखा दिसत नाहीच. पण शाहरूखसारखा अभिनय करण्याचे, त्याची नकल करण्याचे त्याचे प्रयत्न असतात. आधी यासाठी आलोमची टर उडवली जायची. पण आता आलोम बांगलादेशचा स्टार सेलिब्रिटी आहे.
आलोमने आपल्या twitter अकाऊंटवर शाहरूखसोबतची सेल्फी शेअर केली आहे. शाहरूख खानने माझ्यासोबत सेल्फी घेतली, असे कॅप्शन त्याने या सेल्फीला दिले आहे. शिवाय शाहरूख माझा प्रचंड मोठा चाहता आहे, असे सांगत त्याचे आभारही मानले आहेत. हाहाहा...आता ही सेल्फी पाहून तुम्हाला कळायचे ते कळून गेले असेलच. नसेल कळले तर आम्ही सांगतो. ही सेल्फी फेक आहे.



आलोमने त्याचा आवडता अभिनेता शाहरूख खान याच्या फोटोत स्वत:ला मर्ज केले आहे.  हा सगळा फोटोशॉपचा प्रताप आहे. हीच सेल्फी त्याने आपल्या अकाऊंटवर शेअर केलीय. मग काय? यामुळे आपल्याला शाब्बासकी मिळेल, असा आलोमचा अंदाज असावा. पण झाले भलतेच. या प्रकारामुळे आलोमला चांगलेच ट्रोल व्हावे लागले. लोकांनी त्याला बरेच काही सुनावले.

Web Title: Selfie with Shah Rukh Khan shared with Bangladeshi Hero Allaar Bogar; Then something happened !!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.