शाहरूखच्या लेकीला डेट करू इच्छिणाºयांना करावे लागेल या नियमांचे काटेकोर पालन

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2017 22:12 IST2017-01-12T22:10:28+5:302017-01-12T22:12:43+5:30

रोमान्सचा बादशाह शाहरूख खान आपल्या मुलांप्रती विशेषत: मुलगी सुहानाप्रती किती सतर्क असतो हे आपण वेळोवेळी बघत आलोच. पण आता ...

Seeking to date the schedule for the actor, strict adherence to these rules | शाहरूखच्या लेकीला डेट करू इच्छिणाºयांना करावे लागेल या नियमांचे काटेकोर पालन

शाहरूखच्या लेकीला डेट करू इच्छिणाºयांना करावे लागेल या नियमांचे काटेकोर पालन

मान्सचा बादशाह शाहरूख खान आपल्या मुलांप्रती विशेषत: मुलगी सुहानाप्रती किती सतर्क असतो हे आपण वेळोवेळी बघत आलोच. पण आता जर तुम्ही शाहरूखचे सुहानाप्रतीचे विचार ऐकाल तर दंग व्हाल. कारण सुहानाला डेट करणारा मुलगा शाहरूखला अजिबात आवडणार नाही, असे त्याने जाहीरपणे सांगितले आहे. त्याचबरोबर असे धाडस करण्याचा जर कोणी प्रयत्न केला तर त्याला शाहरूखने आखून दिलेल्या कठोर नियमांचे काटेकोरपणे पालन करावे लागेल, असेही त्याने स्पष्ट केले आहे. 



यावरून स्क्रीनवर भलेही शाहरूख खान रोमान्सचा बादशाह म्हणून परिचित असला तरी वास्तविक जीवनात तो याविषयी कितपत सतर्क आहे हेच दिसून येते. शाहरूखने फेमिनाला दिलेल्या मुलाखतीत त्याने हे धक्कादायक खुलासे केले आहेत. तो म्हणाला की, सुहानाला डेट करणाºयांना भरपूर पापड पेलावे लागणार आहेत. त्यांना मी तयार केलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन तर करावे लागेलच शिवाय माझ्या द्वेषाचा त्यांना सामान करावा लागणार आहे. 

तसेच जर मी ठरविलेल्या नियमावलीत एखादा मुलगा बसत नसेल तर त्याने सुहानाप्रती असा विचारदेखील करू नये, असा इशाराही त्याने दिला आहे. शाहरूखची मुलगी सुहाना १६ वर्षाची असून, तिला सार्वजनिक पार्ट्यांमध्ये बºयाचदा अतिशय बोल्ड अवतारात बघण्यात आले आहे. त्यामुळे सुहानाचाही कोणी बॉयफ्रेंड असावा, अशा चर्चांही रंगविल्या गेल्या. मात्र शाहरूखने ज्या पद्धतीने मुलाखतीत सांगितले त्यावरून तिचा कोणी बॉयफ्रेंड असेल, असे दूरदूरपर्यंत दिसत नाही.  



दरम्यान, सुहानाला अ‍ॅक्टिंगची आवड असून, सध्या ती थिएटर करीत आहे. याविषयी जेव्हा शाहरूखला विचारण्यात आले तेव्हा तो तिच्या या आवडीप्रती सकारात्मक असल्याचे त्याने सांगितले. तो म्हणाला की, जर तिला सर्व गोष्टी अनुकूल असतील अन् माझ्यापेक्षा पाचपटीने काम करण्याची अन् १० पटीने कमी मानधन घेण्याची तयारी असेल तर तिने नक्कीच या क्षेत्रात आपले करिअर करायला हवे. कारण सुहानाला तो प्रत्येक अनुभव यावा जो इतर महिला अ‍ॅक्ट्रेसला येत असतो, असेही त्याने सांगितले. 

पुढे बोलताना शाहरूख म्हणाला की, माझी अशी अपेक्षा आहे की सुहाना मॅगझिन पेजवर झळकायला हवी. तिला आवडतील तसे तिने कपडे घालावेत, ती सेक्सी आणि सुंदर दिसायला हवी. मात्र त्याचबरोबर तिने लोकांचा आदरही करायला हवा. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे तिने कठोर परिश्रम घ्यायला हवेत. कारण काही दिवस असेही असतात ज्यामुळे तुम्हाला अडचणींचा सामना करावा लागत असतो. मात्र हे सगळं करण्याअगोदर तिने शिक्षण पूर्ण करावे, असा सल्लाही त्याने दिला. 



त्याचबरोबर सुहाना माझी सर्वात लाडकी आहे. तिचा चेहरा बघूनच मी कामाला सुरुवात करीत असतो. त्यामुळे तिच्या आयुष्याचा प्रत्येक निर्णय घेताना मी जागरूक असतो, असेही शाहरुखने आवर्जून सांगितले. शाहरूख आणि त्याची पत्नी गौरी खान यांना तीन मुले आहेत. मोठा मुलगा आर्यन (१९) फिल्ममेकिंगचे शिक्षण घेत आहे. अब्राम हा तीन वर्षांचा आहे. 

सुहानाला डेट करू इच्छिणाºयांसाठीची नियमावली
१) मुलगा नोकरी करणारा असावा. 
२) त्याने असे नेहमीच लक्षात ठेवावे की, शाहरूख त्याचा द्वेष करतो. 
३) शाहरूखचे त्याच्यावर प्रत्येक ठिकाणी लक्ष असेल. 
४) त्याने अगोदरच वकील ठेवावा. 
५) ती शाहरूखची राजकन्या असून, कोणाची संपत्ती नाही, हेही लक्षात ठेवावे.  
६) सुहानासोबत काही विपरीत केल्यास शाहरूखला जेलमध्ये जाण्यास काहीच वाईट वाटणार नाही.

Web Title: Seeking to date the schedule for the actor, strict adherence to these rules

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.