सलमान खानचा हा फोटो बघून तुम्हीही म्हणाल, ‘प्लीज... पलट ना’

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2017 18:34 IST2017-07-21T13:00:40+5:302017-07-21T18:34:59+5:30

‘ट्यूबलाइट’चे अपयश विसरून बॉलिवूडचा दबंग सलमान खान सध्या त्याच्या आगामी ‘टायगर जिंदा है’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त झाला आहे. ...

Seeing this photo of Salman Khan, you will say, 'Please ... do not turn' | सलमान खानचा हा फोटो बघून तुम्हीही म्हणाल, ‘प्लीज... पलट ना’

सलमान खानचा हा फोटो बघून तुम्हीही म्हणाल, ‘प्लीज... पलट ना’

्यूबलाइट’चे अपयश विसरून बॉलिवूडचा दबंग सलमान खान सध्या त्याच्या आगामी ‘टायगर जिंदा है’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त झाला आहे. शूटिंगचे काही फोटोज् सातत्याने समोर येत असून, यामध्ये सल्लूमियाचा अंदाज घायाळ करणारा आहे. सध्या सलमान मोरक्को येथे चित्रपटाचे शूटिंग पूर्ण करण्यासाठी ठाण मांडून बसला आहे. याचदरम्यान सेटवरील काही फोटोज् सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या फोटोंमध्येही सलमान ‘ट्यूबलाइट’ चित्रपटाप्रमाणेच पाठ दाखवून उभा आहे. हा फोटो बघून त्याच्या चाहत्यांकडून सलमानने एकदा पलटून झलक दाखवावी, असा आग्रह केला नाही तरच नवल. 

असो, या फोटोची वैशिष्ट्ये म्हणजे सलमानच्या गळ्यात त्याचा लकी अफगाणी स्कार्फ दिसत आहे. यावरून हे स्पष्ट होते की, सलमान पुन्हा एकदा या चित्रपटात त्याच्या जुन्या टायगरच्या लूकमध्ये बघावयास मिळणार आहे. सलमानचे हे फोटोज् दिग्दर्शक अली अब्बास जफर यांनी पोस्ट केले आहे. शिवाय कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘जो कोणी हे फोटो बघेल, तो हेच म्हणेल... प्लीज एकदा तरी पलट ना!’ या चित्रपटासाठी सलमान प्रचंड मेहनत घेत असून, त्याने तब्बल १७ किलो वजन कमी केले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा सलमान फिट बॉडीमध्ये बघावयास मिळणार आहे. 

या चित्रपटातही सलमानसोबत त्याची एक्स गर्लफ्रेंड कॅटरिना कैफ रोमान्स करताना दिसणार आहे. तब्बल चार वर्षांनंतर ही प्रसिद्ध जोडी पुन्हा एकदा आपला जलवा दाखविताना दिसणार आहे. काही दिवसांपूर्वीच सलमानचा घोडेस्वारीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. चित्रपटासाठी सलमान घोडेस्वारी शिकत आहे. आयफामध्ये सर्वाधिक चर्चेत राहिल्यानंतर सलमान मोरक्कोला पोहोचला आहे. 

असो, ‘टायगर जिंदा है’ या चित्रपटानंतर सलमान रेमो डिसूजाच्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात करणार आहे. हा चित्रपट पूर्णत: डान्सवर आधारित असून, सलमान यामध्ये एका वडिलांची भूमिका साकारताना दिसणार आहे; मात्र याबाबतची अद्यापपर्यंत अधिकृत घोषणा केलेली नसल्याने चाहत्यांमध्ये या चित्रपटाविषयीची उत्सुकता आणखीच वाढत आहे. 

Web Title: Seeing this photo of Salman Khan, you will say, 'Please ... do not turn'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.