वयाच्या 54 व्या वर्षी श्रीदेवीचा घायाळ करणारा अंदाज पाहाच !

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2017 15:52 IST2017-10-12T10:22:09+5:302017-10-12T15:52:09+5:30

भले ही सध्या जान्हवी कपूर लोकांच्या चर्चाच विषय आहे. मात्र या वयातही श्रीदेवी आपल्या मुलींवर भारी पडू शकते. नुकताच ...

Seeing the death of Sridevi at the age of 54! | वयाच्या 54 व्या वर्षी श्रीदेवीचा घायाळ करणारा अंदाज पाहाच !

वयाच्या 54 व्या वर्षी श्रीदेवीचा घायाळ करणारा अंदाज पाहाच !

े ही सध्या जान्हवी कपूर लोकांच्या चर्चाच विषय आहे. मात्र या वयातही श्रीदेवी आपल्या मुलींवर भारी पडू शकते. नुकताच श्रीदेवीने आपल्या ब्राईडल लूकमध्ये हजेरी लावत सगळ्यांचे लक्ष  वेधून घेतले होते. श्रीदेवी वयाच्या 54 व्या वर्षी पुन्हा एकदा दुल्हनच्या गेटअप मध्ये दिसली. तिचे हे बाईडल लूकमधले  फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत. 'द बैंगळूरु टाइम्स फॅशन वीक 2017' मध्ये श्रीदेवीने ब्रायडल कलेक्शन परिधान करुन रॅमवर उतरली होती. या फॅशन वीकमध्ये अनेक कलाकारांनी रॅमवर हजेरी लावली होती. मात्र सगळ्यांच्या नजरा खिळल्या त्या श्री देवीवर. कोणाच्या नजरा श्रीदेवीवरुन हटायला तयार नव्हत्या.


या दोन दिवसांच्या फॅशन वीकमध्ये देशातल्या मोठ-मोठ्या डिझानर्सनी आपले कलेक्शन इथे सादर केले. भारताची फुलराणी सायना नेहवाल ही रॅम्पवर उतरली होती. सायना डिझायनर नीला लूलाची शो स्टॉपर होती. तर श्री देवीने मनीषा म्होत्राने डिझाइन केलेला लेहेंगा परिधान केला होता.  या लाल कलरच्या लेहेंग्याने श्रीदेवीच्या सौदर्यांला चार चाँद लावले होते. 


श्रीदेवीने बालकलाकार म्हणून आपल्या करिअरला सुरुवात केली होती. 'कंदन करुनई’ या तामिळ चित्रपटात ती बालकलाकार म्हणून दिसली होती. अनेक पौराणिक चित्रपटांमध्ये तिने काम केले आहे. १६ व्या वर्षी श्रीदेवीने बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवले. तिचा पहिला चित्रपट अपयशी ठरला. पण श्रीदेवीने जितेंद्रसोबत ‘हिम्मतवाला’ साईन केला आणि श्रीदेवी रातोरात स्टार झाली. १९९६ साली श्रीदेवी दिग्दर्शक बोनी कपूरबरोबर लग्नगाठीत अडकली. बोनी कपूर यांनी  श्रीदेवीला ‘मि. इंडिया’ची ऑफर दिली. श्रीदेवीला हा चित्रपट करायचा नव्हता. म्हणून तिने या चित्रपटासाठी बोनीला १० लाख रुपए मानधन मागितले. त्याकाळात ही रक्कम फार मोठी होती. पण बोनीने श्रीदेवीची ही मागणी मान्य केली. हा चित्रपट तयार झाला आणि सुपरहिट झाला. याचदरम्यान श्रीदेवीची आई आजारी पडली आणि तिला उपचारासाठी अमेरिकेला न्यावे लागले. हा संपूर्ण खर्च बोनीने उचलला. बोनीच्या या स्वभावामुळे श्रीदेवी त्याच्या जवळ आली. पुढे त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला. बोनी विवाहित होता. पहिल्या पत्नीला घटस्फोट देऊन बोनीने श्रीदेवीशी लग्न केले. 

Web Title: Seeing the death of Sridevi at the age of 54!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.