पाहा ​तैमूरच्या बहिणीचा फोटो आला समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2017 15:51 IST2017-10-02T10:21:54+5:302017-10-02T15:51:54+5:30

सैफ अली खान आणि करिनाचा मुलगा तैमुर खान सध्या सोशल मीडियावर चांगलाच हिट झाला आहे. तैमुर सध्या नऊ महिन्यांचा ...

See Taimur's sister got a photo | पाहा ​तैमूरच्या बहिणीचा फोटो आला समोर

पाहा ​तैमूरच्या बहिणीचा फोटो आला समोर

फ अली खान आणि करिनाचा मुलगा तैमुर खान सध्या सोशल मीडियावर चांगलाच हिट झाला आहे. तैमुर सध्या नऊ महिन्यांचा असून त्याच्यासोबत खेळायला पतौडी कुटुंबात आता एक छोटेसे बाळ आले आहे. तैमुरची आत्या आणि प्रसिद्ध अभिनेत्री सोहा अली खानने नुकतेच एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे. सोहाला ब्रीच कँडी रुग्णालयातून सोडण्यात आले असून रुग्णालयाच्या बाहेर मीडियाच्या कॅमेऱ्यात सोहाच्या मुलीला टिपण्यात आले. वडील कुणाल खेमूच्या हातात गुलाबी मुलायम कापडात बांधलेली चिमुकली आपल्याला दिसत आहे. पण कुणाल तिला कॅमेऱ्यांपासून वाचवण्याचा प्रयत्न करत असल्याने आपल्याला या फोटोत तिचा चेहरा पाहायला मिळत नाहीये. या फोटोत सोहा एकदम फिट असल्याचे आपल्याला दिसून येत आहे. 
कुणालनेच त्यांची ही गुड न्यूज मीडियाला दिली आहे. कुणालाने ट्वीटद्वारे त्यांच्या फॅन्सना ही बातमी सांगितली होती. कुणालने त्यांच्या ट्वीटमध्ये म्हटले होते की, आम्हाला सगळ्यांना तुम्हाला सांगायला आनंद होत आहे की, नवरात्रीच्या पवित्र दिवसांत आमच्या घरात छोट्याशा परीचे आगमन झाले आहे. सोहा आणि आमच्या मुलीची दोघांचीही तब्येत चांगली आहे.
सोहा अली खान आणि कुणाल खेमू या दाम्पत्याने नुकत्याच जन्मलेल्या त्यांच्या चिमुकलीचे नामकरण देखील केले आहे. कुणालने ट्वीट करून त्याच्या मुलीचे नाव चाहत्यांबरोबर शेअर केले होते. कुणाल आणि सोहाने सर्वांच्या अनुमतीने मुलीचे नाव इनाया नाओमी खेमू असे ठेवले आहे. यावेळी कुणालने लिहिले की, इनाया खूप खुश आणि हेल्दी आहे. तुम्हा सर्वांनी आशीर्वाद आणि प्रेम दिल्याबद्दल ती तुम्हाला धन्यवाद म्हणत आहे.
सोहा आणि कुणाल खेमू यांनी जुलै २०१४ मध्ये पॅरिसला जाऊन साखरपुडा केला होता. कुणालने पॅरिसच्या रोमँटिक वातावरणात सोहाला लग्नासाठी प्रपोज केले होते. याआधी ते दोघे अनेक महिने लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहात होते. त्यांनी जानेवारी २०१५ मध्ये लग्न केले. सोहा अली खान अनेक दिवसांपासून मोठ्या पडद्यापासून दूर आहे तर कुणाल अजय देवगनसोबत गोलमाल या चित्रपटामध्ये दिसणार आहे.

Also Read : ​आत्या सोहा अली खानला एकटक बघत होता चिमुकला तैमूर !

Web Title: See Taimur's sister got a photo

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.