पाहा : ‘रणवीर चिंग रिटर्न्स’चा ट्रेलर
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2016 18:18 IST2016-08-11T12:48:44+5:302016-08-11T18:18:44+5:30
अभिनेता रणवीर सिंह आणि दिग्दर्शक रोहित शेट्टी ही जोडी एकत्र काम करणार आहे, ही बातमी तुमच्यापर्यंत पोहोचली आहेच. रणवीर व रोहित एकत्र आलेत, हे खरे आहे. पण कुठल्या सिनेमासाठी नव्हे तर एका जाहिरातीच्या निमित्ताने.

पाहा : ‘रणवीर चिंग रिटर्न्स’चा ट्रेलर
अ िनेता रणवीर सिंह आणि दिग्दर्शक रोहित शेट्टी ही जोडी एकत्र काम करणार आहे, ही बातमी तुमच्यापर्यंत पोहोचली आहेच. रणवीरनेच काही दिवसांपूर्वी एक पोस्टर शेअर करून रोहित शेट्टीसोबत काम करत असल्याची बातमी दिली होती. त्यामुळे रणवीर व रोहितच्या या सिनेमाबद्दलची चाहत्यांची उत्कंठा शिगेला पोहोचली होती. आता एक धम्माल सिनेमा पाहायला मिळणार, असेच सर्वांना वाटले होते. पण असे काहीही नाहीयं. रणवीर व रोहित एकत्र आलेत, हे खरे आहे. पण कुठल्या सिनेमासाठी नव्हे तर एका जाहिरातीच्या निमित्ताने. होय, जगात होत असलेला अन्नाचा तुटवडा आणि त्यामुळे त्रस्त झालेले लोक यांच्या रक्षणकर्त्याच्या रुपात आलेला रणवीर सिंग त्यांना मदत करणार आहे, असे या जाहिरातीमध्ये दाखवण्यात आले आहे. रणवीर सिंगने ट्विटरवर या जाहिरातीचा पहिला ट्रेलर शेअर केला आहे.‘रणवीर चिंग रिटर्न्स’ म्हणून या जाहिरातीचे कॅम्पेन करण्यात आले आहे. एखाद्या हॉलिवूड सिनेमाच्या तोडीच्या या जाहिरातीचे दिग्दर्शन रोहित शेट्टीने केले आहे. येत्या १९ आॅगस्टला ही जाहिरात प्रदर्शित होणार आहे. या जाहिरातीतीच्या निमित्ताने रणवीर सिंग आणि तमन्ना भाटिया हीजोडी पहिल्यांदाच एकत्र पाहायला मिळणार आहे.