SEE PICS : विद्या बालनच्या बहिणीचा इंटरनेटवर जलवा; इन्स्टावर फॉलोअर्सचा उच्चांक!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2017 14:13 IST2017-08-02T08:43:26+5:302017-08-02T14:13:26+5:30

बॉलिवूडमध्ये अभिनेत्री विद्या बालन हिचा एक वेगळाच दबदबा आहे. ‘कहानी’, ‘बेगम जान’ यांसारख्या महिला केंद्रित चित्रपटांमधून विद्याने इंडस्ट्रीत स्वत:चे ...

SEE PICS: Vidya Balan's sister wakes up on the Internet; Followers on the top! | SEE PICS : विद्या बालनच्या बहिणीचा इंटरनेटवर जलवा; इन्स्टावर फॉलोअर्सचा उच्चांक!

SEE PICS : विद्या बालनच्या बहिणीचा इंटरनेटवर जलवा; इन्स्टावर फॉलोअर्सचा उच्चांक!

लिवूडमध्ये अभिनेत्री विद्या बालन हिचा एक वेगळाच दबदबा आहे. ‘कहानी’, ‘बेगम जान’ यांसारख्या महिला केंद्रित चित्रपटांमधून विद्याने इंडस्ट्रीत स्वत:चे एक वेगळेच स्थान निर्माण केले आहे. आता तिच्या पावलावर पाऊल टाकण्याचा प्रयत्न तिची बहीण करीत आहे. होय, विद्या बालनची बहीण प्रियमणी बॉलिवूडमध्ये सक्रिय नसली तरी साउथमध्ये तिने असाच काहीसा दबदबा निर्माण केला आहे. त्याचा पुरावा म्हणून इंटरनेटचा दाखला देता येईल. कारण गुगलसह सोशल मीडियावर प्रियमणीचा सध्या बोलबाला आहे. इन्स्टाग्रामवर तिचे ज्या पद्धतीने फॉलोअर्स वाढत आहेत, त्यावरून ती अभिनयाबरोबरच सोशल मीडियावरही क्वीन ठरत असल्याची आता चर्चा रंगू लागली आहे. 





अभिनय आणि मॉडलिंग क्षेत्रात झळकत असलेली प्रियमणी नेहमीच कुठल्या ना कुठल्या कारणाने चर्चेत असते. त्यातही वादग्रस्त कारणांमुळे ती आतापर्यंत बºयाचदा लाइमलाइटमध्ये आली आहे. परंतु यावेळेस ती वादग्रस्त नव्हे तर चांगल्या कारणांनी चर्चेत आहे. प्रियमणीला सध्या इंटरनेटवर सर्वाधिक सर्च केले जात आहे. त्याचबरोबर इन्स्टावरील तिची फॅन्स फॉलोइंग मोठ्या प्रमाणात वाढली आहे. प्रियमणी दररोज तिचे सुंदर फोटोज् सोशल अकाउंटवर पोस्ट करीत असल्याने तिच्या चाहत्यांच्या संख्येत दिवसागणिक भर पडत आहे. खरं तर साउथमध्ये प्रियमणीचे नाव अतिशय सन्मानाने घेतले जाते. कारण तिने जे काही यश मिळविले आहे ते खरोखरच कौतुकास्तपद आहे.  





प्रियमणीने तिच्या करिअरची सुरुवात ‘कांचिपुरम सिल्क्स, इरोड सिल्क्स आणि लक्ष्मी सिल्क्स’ या बॅण्डच्या मॉडलिंगने केली होती. तेव्हा ती इयत्ता बारावीची परीक्षा देत होती. पुढे तामीळ दिग्दर्शक भारतीराजा याने तिला चित्रपटांमध्ये ब्रेक दिला. सुरुवातीला तिला अपेक्षित असे यश मिळाले नाही. परंतु कार्थीसोबत आलेल्या ‘वासिगरन’ या चित्रपटातून तिला यश मिळत गेले. या चित्रपटातील भूमिकेसाठी तिला राष्ट्रीय पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले होते. प्रियमणीने आज अभिनय क्षेत्रात बराचसा पल्ला गाठला असला तरी, तिने मॉडलिंग क्षेत्रापासून स्वत:ला दूर केले नाही. त्यामुळेच तिच्या यशात भर पडत असून, ती एक दमदार अभिनेत्री तथा मॉडेल म्हणून पुढे येत आहे. 

Web Title: SEE PICS: Vidya Balan's sister wakes up on the Internet; Followers on the top!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.