SEE PICS : सनी लिओनीच्या ‘त्या’ शंभर उत्साही चाहत्यांसह स्टोअर मालकावर गुन्हा दाखल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2017 15:11 IST2017-08-19T09:41:41+5:302017-08-19T15:11:41+5:30

सध्या सनी लिओनी तिच्या हॉटनेसमुळे नव्हे तर भलत्याच कारणाने चर्चेत आहे. गेल्या गुरुवारी सनी एका मोबाइल स्टोरच्या उद्घाटनासाठी कोचीला ...

SEE PICS: Sunny Leone's 'One' with a hundred enthusiastic fans filed an offense against the store owner! | SEE PICS : सनी लिओनीच्या ‘त्या’ शंभर उत्साही चाहत्यांसह स्टोअर मालकावर गुन्हा दाखल!

SEE PICS : सनी लिओनीच्या ‘त्या’ शंभर उत्साही चाहत्यांसह स्टोअर मालकावर गुन्हा दाखल!

्या सनी लिओनी तिच्या हॉटनेसमुळे नव्हे तर भलत्याच कारणाने चर्चेत आहे. गेल्या गुरुवारी सनी एका मोबाइल स्टोरच्या उद्घाटनासाठी कोचीला गेली होती. याठिकाणी तिच्या चाहत्यांनी अशी काही गर्दी केली होती की, परिसरातील संपूर्ण रस्ते आणि महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. तिच्या चाहत्यांनी सनीचे अतिशय जल्लोषात स्वागत केले. तिची एक झलक पाहण्यासाठी चाहते अक्षरश: भान विसरून तिच्या कारच्या मागे धावत होते. बघता-बघता एवढी गर्दी झाली होती की, परिसरातील सर्व वाहतुकीचा खेळखंडोबा झाला होता. 

सनीबद्दल चाहत्यांनी दाखविलेल्या या अमाप उत्साहामुळे कोचीच्या ट्रॅफिक पोलिसांना महात्मा गांधी रोडवरील वाहतुकीवर नियंत्रण मिळविणे अवघड झाले होते. त्यामुळे गर्दीवर नियंत्रण मिळविण्यासाठी पोलिसांना दोनदा लाठीचार्ज करावा लागला. तरीदेखील लोकांच्या उत्साहाला आवर घालणे पोलिसांना अशक्य झाले होते. अशात पोलिसांनी संबंधित मोबाइल स्टोअर मालकांबरोबर गर्दीतील शंभर उत्साही लोकांवर २८३ आणि ३४ कलमा अन्वये गुन्हा दाखल केला आहे. शहरात कित्येक तास वाहतुकीचा खळखंडोबा करण्याबद्दल ही कलमे लावण्यात आली आहेत. 



सनीची झलक बघण्यासाठी चाहत्यांचा उत्साह आता चांगलाच महागात पडला असून, संबंधित स्टोअर मालकाचीही डोकेदुखी वाढली आहे. खरं तर सनी लिओनीला आमंत्रित करताना वाहतुकीचे पूर्वनियोजन करणे अपेक्षित होते. परंतु संबंधित स्टोअर मालकाने पोलिसांना तशा सूचना सांगितल्या नसल्यानेच हा सर्व प्रकार घडला. जेव्हा सनी स्टोअरपर्यंत पोहोचली होती, तेव्हा लोकांनी तिच्या कारच्या चहूबाजूने वेढा घातला होता. तिची झलक बघण्यासाठी मिळेल त्याठिकाणी उभे राहून लोक गोंधळ घालत होते. 



सनीला बघण्यासाठी आलेल्या या गर्दीची सोशल मीडियावरही चांगली खिल्ली उडविण्यात आली. अनेकांनी या गर्दीची तुलना अमेरिकेचे राष्टÑाध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथविधीशी केली आहे. दरम्यान, सनीने तिच्या सोशल अकाउंटवरून एक व्हिडीओ शेअर करून चाहत्यांचे आभार मानले आहे. ‘मी तुमचे प्रेम आणि समर्थन बघून भावनाविवश झाली आहे. त्यासाठी माझ्या सर्व चाहत्यांचे मनापासून आभार’

Web Title: SEE PICS: Sunny Leone's 'One' with a hundred enthusiastic fans filed an offense against the store owner!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.