SEE PICS : ​सनी लिओनीला मिळाले ‘स्वप्नातले घर’!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2017 15:45 IST2017-05-21T10:15:39+5:302017-05-21T15:45:39+5:30

पॉर्न स्टार ते बॉलिवूड स्टार असा यशस्वी प्रवास करणारी अभिनेत्री सनी लिओनीचे अनेक वर्षांपासून उराशी बाळगलेले एक स्वप्न पूर्ण ...

SEE PICS: Sunny Leone gets 'dream house'! | SEE PICS : ​सनी लिओनीला मिळाले ‘स्वप्नातले घर’!

SEE PICS : ​सनी लिओनीला मिळाले ‘स्वप्नातले घर’!

र्न स्टार ते बॉलिवूड स्टार असा यशस्वी प्रवास करणारी अभिनेत्री सनी लिओनीचे अनेक वर्षांपासून उराशी बाळगलेले एक स्वप्न पूर्ण झाले आहे. होय, स्वत:चे हक्काचे एक सुंदर घर असावे, असे सनीचे स्वप्न होते. ते अखेर खरे झाले.  सनी लिओनी व तिचा पती डेनियल वेबर या दोघांनी अमेरिकेतील लॉस एंजिलिस येथे एक बंगला खरेदी केला आहे. सनी लिओनीने खरेदी केलेला हा बंगला शेर्मन ओक्स परिसरात आहे. शेर्मन ओक्स या परिसरात अनेक हॉलिवूड स्टार्सचे बंगले आहेत.  

{{{{twitter_post_id####}}}}






 सनी लिओनीचा हा बंगला म्हणजे तिचे बर्थडे गिफ्ट असल्याचे बोलले जात आहे. आता हे बर्थ डे गिफ्ट सनीला कुणी दिले, आम्हाला ठाऊक नाही. पण सनीच्या या घराचे फोटो पाहून सनीचे हे घर खरोखरीच स्वप्नातले घर आहे, हे आम्ही ठामपणे सांगू शकणार आहोत. सनीने तिच्या सोशल अकाऊंटवर या घराचे फोटो शेअर केले आहेत. सनीच्या या बंगल्यात पाच बेडरुम, एक स्विमिंग पूल, होम थिएटर, गार्डनचा समावेश आहे. हा बंगला जवळपास एक एकर क्षेत्रफळात बांधण्यात आला आहे.  सनीआणि तिचा पती डेनियल लवकरच या बंगल्यामध्ये शिफ्ट होणार असल्याचे बोलले जात आहे.





ALSO READ : OMG !! ​सनी लिओनी बनली ‘FOOL’!!

  डेनियल आणि सनी लिओनी गेल्या अनेक दिवसांपासून अलिशान बंगला खरेदी करण्यासाठी शोधत होते. मात्र, त्यांना चांगला बंगला मिळत नव्हता. मात्र,  सनीच्या वाढदिवसापूर्वी हा बंगला त्यांना मिळाला आणि त्यांचे स्वप्न पूर्ण झाले. सनीच्या या नव्या घरासाठी तिचा शुभेच्छा देऊ यात. शिवाय तिच्या या अलिशान घराचे काही फोटोही पाहुयात.

Web Title: SEE PICS: Sunny Leone gets 'dream house'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.