SEE PICS : मुकेश अंबानींच्या घरी हरवला शाहरूख खानचा शूज; अंबानींनी राबविली शोधमोहीम!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2017 22:01 IST2017-08-29T16:24:28+5:302017-08-29T22:01:52+5:30
गणेश चतुर्थीनिमित्त उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरी गणेशोत्सवाचे सेलिब्रेशन करण्यात आले. यावेळी बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटी उपस्थित होते. किंग शाहरूख ...

SEE PICS : मुकेश अंबानींच्या घरी हरवला शाहरूख खानचा शूज; अंबानींनी राबविली शोधमोहीम!
ग ेश चतुर्थीनिमित्त उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरी गणेशोत्सवाचे सेलिब्रेशन करण्यात आले. यावेळी बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटी उपस्थित होते. किंग शाहरूख खानही या उत्सवात सहभागी झाला होता. मात्र यावेळी त्याच्यासोबत एक चांगलीच गंमत झाली. जेव्हा गणपतीच्या आरतीत तो सहभागी झाला होता, तेव्हा आरतीनंतर पायात शूज घालणे तो विसरला. बराच वेळ तो शूज न घालताच इकडेतिकडे फिरत होता. जेव्हा पार्टी संपल्यानंतर तो मुकेश अंबानी यांच्या बंगल्याबाहेर आला तेव्हा त्याला कोणीतरी आठवण करून दिली की, ‘तू शूज घातलेले नाहीत.’
![]()
त्यानंतर शाहरूखनेही लगेचच त्याच्या असिस्टंटला शूज शोधण्यास सांगितले. तोपर्यंत पार्टीत शाहरूखचे शूज हरविल्याची बातमी वाºयासारखी पसरली. शिवाय शाहरूखलाही त्याने शूज नेमके कुठे काढले हे आठवत नव्हते. त्यामुळे शाहरूखच्या शूज हरविल्याचा किस्सा पार्टीमध्ये चर्चेचा विषय ठरला. शाहरूखच्या असिस्टंटबरोबरच आणखी काही लोक त्याचा शूज शोधत होते. ‘स्पॉटबॉय’ या वेबसाइटने दिलेल्या माहितीनुसार, जेव्हा ही बाब मुकेश अंबानी यांचा मोठा मुलगा आकाश आला कळली तेव्हा तोही शाहरूखचे शूज शोधत होता.
![]()
बराच वेळ शोधूनही शूज मिळत नव्हते तेव्हा शाहरूखने स्वत:च शोधमोहीम सुरू केली. शिवाय आकाश अंबानी आपले शूज शोधत असल्याचे शाहरूखच्या लक्षात आल्यानंतर त्याला आश्चर्य वाटत होते. बराच वेळ शोधमोहीम राबविल्यानंतर शाहरूखला त्याचे शूज मिळाले. त्याने शूज घालून लगेचच पार्टीतून काढता पाय घेत घर गाठले. मुकेश अंबानी आणि त्यांची पत्नी नीता अंबानी यांनी त्यांच्या घरी गणेश चतुर्थीनिमित्त एका पार्टीचे आयोजन केले होते. पार्टीत बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटी उपस्थित होते.