See Pics: दीपिका पादुकोणचा एअरफोर्टवरील फंकी लूक तुम्ही पाहिला?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2019 19:12 IST2019-08-10T19:00:28+5:302019-08-10T19:12:20+5:30
दीपिका पादुकोण हिचा अभिनय आणि फिटनेसचे कोटींच्या घरात दिवाने आहेत. ती कायमच तिच्या फिटनेसबद्दल खूपच कॉन्शियस असते. सोशल मीडियावरही तिचे वेगवेगळे फोटो, व्हिडीओ चर्चेत असतात.

See Pics: दीपिका पादुकोणचा एअरफोर्टवरील फंकी लूक तुम्ही पाहिला?
बॉलिवूडची मस्तानी गर्ल दीपिका पादुकोण हिचा अभिनय आणि फिटनेसचे कोटींच्या घरात दिवाने आहेत. ती कायमच तिच्या फिटनेसबद्दल खूपच कॉन्शियस असते. सोशल मीडियावरही तिचे वेगवेगळे फोटो, व्हिडीओ चर्चेत असतात. अलीकडेच ती एअरपोर्टवर अत्यंत क्यूट अंदाजात दिसून आली. तिने पांढºया रंगाचा कोट आणि जीन्स घातलेली होती. तिचा हा एअरपोर्ट लूक चाहत्यांना भलताच आवडतो आहे. ती तिचा पती रणवीर सिंग याला भेटण्यासाठी जात होती तेव्हा पापाराझींनी तिचे अनेक क्लिक्स काढले आणि या तिच्या फोटोंवर चाहते प्रचंड फिदा झाले आहेत.
रणवीर सिंग ही सध्या ‘८३’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. याच चित्रपटात दीपिका देखील त्याच्या पत्नीच्या भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट १९८३ या वर्षी भारतीय क्रिकेट टीमने जिंकलेल्या वर्ल्डकपवर आधारित आहे. दीपिका सध्या ‘छपाक’ या चित्रपटात बिझी आहे. मेघना गुलजार दिग्दर्शित या चित्रपटात दीपिका अॅसिड हल्ल्यातील पीडिता लक्ष्मी अग्रवालची भूमिका साकारताना दिसणार आहे.