SEE PICS : ग्लॅमर विश्वापासून दूर असूनही ‘या’ तरुणी’ने लाखो लोकांना लावले वेड !

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2017 18:31 IST2017-08-20T13:01:49+5:302017-08-20T18:31:49+5:30

बॉलिवूड स्टार वरुण धवन याला त्याची स्टाइल, लुक्स आणि अभिनयासाठी संपूर्ण इंडस्ट्रीत ओळखले जाते. वरूणने स्वत:च्या हिमतीवर अल्पावधितच चित्रपटसृष्टीत ...

SEE PICS: Despite being away from the world of glamor, this 'teenager' has brought millions of people crazy! | SEE PICS : ग्लॅमर विश्वापासून दूर असूनही ‘या’ तरुणी’ने लाखो लोकांना लावले वेड !

SEE PICS : ग्लॅमर विश्वापासून दूर असूनही ‘या’ तरुणी’ने लाखो लोकांना लावले वेड !

लिवूड स्टार वरुण धवन याला त्याची स्टाइल, लुक्स आणि अभिनयासाठी संपूर्ण इंडस्ट्रीत ओळखले जाते. वरूणने स्वत:च्या हिमतीवर अल्पावधितच चित्रपटसृष्टीत स्वत:ची जागा निर्माण केली आहे. मात्र त्याची पुतणी अंजिनी धवन हिने कुठलीही चित्रपटाची पार्श्वभूमी नसताना सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली आहे. अंजिनी सोशल मीडियावर एवढी प्रसिद्ध आहे की, तुम्हाला त्याची कल्पनाही नसेल. 











अंजिनी इन्स्टाग्रामवर तिचे बोल्ड आणि ग्लॅमरस फोटो अपलोड करीत असते. नेटिझन्सला अंजिनीचा बोल्ड आणि ग्लॅमरस अंदाज खूपच भावतो. तिच्या प्रत्येक फोटोला यूजर्सकडून प्रचंड प्रतिसाद मिळतो. अंजिनीला इन्स्टाग्रामवर ६६ हजारांपेक्षा अधिक यूजर्स फॉलो करतात. शिवाय तिचे फोटो व्हायरल केले जात असल्याने अंजिनी सोशल मीडियावर चांगलीच प्रसिद्ध होत आहे. कारण तिचे हे फोटो लाखोंच्या संख्येने बघितले जात आहेत. 











वास्तविक अंजिनीने आतापर्यंत केवळ २३३ फोटो तिच्या अकाउंटवर अपलोड केलेले आहेत. अंजिनी एक टीनएजर आहे. त्यामुळे तिच्या फॅन फॉलोइंगची संख्या आश्चर्यचकीत करणारी आहे. अंजिनी वरुण धवनचा चुलत भाऊ सिद्धार्थ धवन यांची मुलगी आहे, तर अनिल धवन यांची नात आहे. अनिल धवन यांचे नाव जर तुम्हाला माहिती नसेल तर ‘प्यार का घर, हसीना मान जाएगी, जोडी नंबर वन’ या चित्रपटांची यादी डोळ्यासमोर आणल्यास तुमच्या लक्षात येईल. होय, अनिल धवन यांनी या चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्याचबरोबर ‘कोरा कागज’ आणि ‘हीरा’ यांसारख्या मालिकांमध्येही ते झळकले आहेत. 











दरम्यान, अंजिनीने इन्स्टाग्रामवर अपलोड केलेल्या चित्रपटांचे वैशिष्ट्ये म्हणजे तिने एकाही फोटोला कॅप्शन दिलेले नाही. शिवाय तिच्या अकाउंटच्या डिसक्रिप्शनमध्ये केवळ ई-मेल आयटी आणि स्नॅपचॅट अकाउंट आयडी दिलेला आहे. आम्ही तुमच्यासाठी अंजिनीचे काही सुंदर फोटो सदर वृत्तात अपलोड केले असून, तुम्हाला तिचे ग्लॅमर भावेल यात शंका नाही. 

Web Title: SEE PICS: Despite being away from the world of glamor, this 'teenager' has brought millions of people crazy!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.