SEE PICS : कार अपघातात दंगल गर्ल जायरा वसीम थोडक्यात बचावली!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2017 17:50 IST2017-06-10T12:19:38+5:302017-06-10T17:50:02+5:30
अभिनेता आमिर खान याच्या सुपरहिट ‘दंगल’ या चित्रपटात झळकलेली जायरा वसीम कार अपघातातून थोडक्यात बचावली आहे. बुलेवार्ड रस्त्यावरून जात ...

SEE PICS : कार अपघातात दंगल गर्ल जायरा वसीम थोडक्यात बचावली!
अ िनेता आमिर खान याच्या सुपरहिट ‘दंगल’ या चित्रपटात झळकलेली जायरा वसीम कार अपघातातून थोडक्यात बचावली आहे. बुलेवार्ड रस्त्यावरून जात असताना जायराच्या चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले. ज्यामुळे कार बाजूलाच असलेल्या एका भल्या मोठ्या तलावात जाऊन बुडू लागली. मात्र स्थानिक लोकांनी वेळीच धाव घेतल्याने जायरासह तिचा मित्र आणि चालकाला तलावाबाहेर काढणे शक्य झाले.
एका स्थानिक व्यक्तीने दिलेल्या माहितीनुसार, ‘पांढºया रंगाच्या स्कॉर्पिओ कारमध्ये जायरा आणि तिचा मित्र जात होते. स्थानिक लोकांच्या मदतीमुळे जायरा आणि तिच्या साथीदारांना वाचविणे शक्य झाले. जायराला किरकोळ दुखापत झाली असून, तिचा मित्र आरिफ अहमद हा गंभीररीत्या जखमी झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्या कारमध्ये ही घटना घडली ती एका राजकीय नेत्याच्या नावावर आहे.

}}}} ">Srinagar: Actor Zaira Wasim had a narrow escape after her car skidded off the road and fell into the Dal Lake on June 8th. pic.twitter.com/7U2gUviXvA— ANI (@ANI_news) June 10, 2017दरम्यान, संबंधित कारचा मालक हा शहरात नसून, पोलीस त्याविषयी तपास करीत आहेत. प्रत्यक्षदर्शीने दिलेल्या माहितीनुसार, कार भरधाव वेगात असल्यानेच हा अपघात झाला आहे. कारवरील चालकाचे नियंत्रण सुटल्यानेच कार तलावात गेली. सुदैवाने यात कुठलीही जीवित हानी झाली नाही. दरम्यान, पोलिसांनी सार्वजनिक संपत्तीचे नुकसान होण्याबाबतची तक्रार दाखल केली आहे. जायराने आमिरच्या ‘दंगल’ या चित्रपटात युवा गीता फोगाटची भूमिका साकारली होती.
Srinagar: Actor Zaira Wasim had a narrow escape after her car skidded off the road and fell into the Dal Lake on June 8th. pic.twitter.com/7U2gUviXvA— ANI (@ANI_news) June 10, 2017