​SEE PICS : घ्या बॉलिवूड सेलिब्रिटींच्या घरच्या बाप्पाचे दर्शन!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2017 10:48 IST2017-08-26T04:55:31+5:302017-08-26T10:48:34+5:30

शुक्रवारी वाजतगाजत गणरायाचे आगमन झाले. घराघरात मोठ्या उत्साहात श्रींची स्थापना झाली. बॉलिवूडच्या अनेक सेलिब्रिटींच्या घरीही बाप्पांचे आगमन झाले. अभिनेत्री ...

SEE PICS: Bollywood celebrities house bappa! | ​SEE PICS : घ्या बॉलिवूड सेलिब्रिटींच्या घरच्या बाप्पाचे दर्शन!

​SEE PICS : घ्या बॉलिवूड सेलिब्रिटींच्या घरच्या बाप्पाचे दर्शन!

क्रवारी वाजतगाजत गणरायाचे आगमन झाले. घराघरात मोठ्या उत्साहात श्रींची स्थापना झाली. बॉलिवूडच्या अनेक सेलिब्रिटींच्या घरीही बाप्पांचे आगमन झाले. अभिनेत्री श्रद्धा कपूर, माधुरी दीक्षित, अभिनेता हृतिक रोशन, नील नितीन मुकेश, संजय दत्त असे सगळे बॉलिवूड स्टार बाप्पाच्या आगमनाने सुखावून गेलेत. सेलिब्रिटींच्या घरच्या बाप्पांचे दर्शन आम्ही तुम्हाला घडवणार आहोत.अभिनेत्री माधुरी दीक्षित हिच्या घरीही बाप्पांचे आगमन झाले. यावेळी माधुरी अतिशय आनंदात दिसली.



अभिनेत्री श्रद्धा कपूर हिने आपल्या संपूर्ण कुटुंबासह गणेशोत्सव साजरा केला. बाप्पाच्या स्वागतापासून तर स्थापनेपर्यंत श्रद्धा या उत्साहात सहभागी झाली.





काही महिन्यांपूर्वी लग्नाच्या बंधनात अडकणारा अभिनेता नील नितीन मुकेश याने पत्नी रूख्मिणी हिच्यासोबत गणेश पूजा केली. नील आणि रूक्मिणी यांनी संपूर्ण परिवारासह गणेशाचे स्वागत केले.





संजय दत्त आणि त्याची पत्नी मान्यता दत्त हे दोघेही बाप्पापुढे नतमस्तक झालेले दिसले. दोघेही गणेशाची आरती करताना दिसले.







हृतिक रोशनच्या घरी दरवर्षी गणेशोत्सव उत्साहात साजरा केला जातो. यंदा हृतिक गणेशाची सजावट करताना दिसला.



गोविंदा हाही बाप्पासमोर असा नतमस्तक झाला.



ज्येष्ठ अभिनेते जितेन्द्र यांनीही बाप्पाची मनोभावे पूजाअर्चा केली.



अभिनेता सोनू सूद याच्या घरीही बाप्पाची स्थापना झाली.  आपल्या कुटुंबासोबत त्याने बाप्पाची अशी आराधना केली.



‘बाहुबली’ अभिनेत्री तमन्ना भाटिया हिच्या घरीही बाप्पा विराजमान झाले आहेत. तमन्नानेही बाप्पाची मोठ्या भक्तिभावाने पूजन केले.



अदिती राव हैदरी हिच्या घरीही बाप्पा अवतरले. तिनेही बाप्पाचे मनोभावे दर्शन घेतले.

Web Title: SEE PICS: Bollywood celebrities house bappa!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.