SEE PICS : ​ ‘अशोका’ फेम हृषिता भट्ट अडकली लग्नबंधनात!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2017 12:33 IST2017-03-08T07:03:10+5:302017-03-08T12:33:10+5:30

‘अशोका’ या चित्रपटात शाहरूख खानसोबत काम करणारी हृषिता भट्ट आठवते? होय, तीच ती हृषिता भट्ट लग्नबंधनात अडकली आहे. हृषिताने अगदी गुपचूप युएन डिप्लोमेट आनंद तिवारी याच्यासोबत लग्नगाठ बांधली. अतिशय जवळच्या नातेवाईकांच्या उपस्थितीत हा विवाह सोहळा पार पडला.

SEE PICS: 'Ashoka' Fame Hrishita Bhatt stuck in a marriage! | SEE PICS : ​ ‘अशोका’ फेम हृषिता भट्ट अडकली लग्नबंधनात!

SEE PICS : ​ ‘अशोका’ फेम हृषिता भट्ट अडकली लग्नबंधनात!

शोका’ या चित्रपटात शाहरूख खानसोबत काम करणारी हृषिता भट्ट आठवते? होय, तीच ती हृषिता भट्ट लग्नबंधनात अडकली आहे. हृषिताने अगदी गुपचूप युएन डिप्लोमेट आनंद तिवारी याच्यासोबत लग्नगाठ बांधली. अतिशय जवळच्या नातेवाईकांच्या उपस्थितीत हा विवाह सोहळा पार पडला. हृषिताने या सोहळ्याचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. गेल्या सहा महिन्यांपासून हृषिता व आनंद रिलेशनशिपमध्ये होते. सहा महिन्यांच्या डेटिंगनंतर गत ४ मार्चला हृषिता व आनंद यांचा विवाह बंधनात अडकले. लग्नात ३५ वर्षांच्या हृषिताने लाल रंगाचा लाचा घातला होता.






 

हृषिताने ‘दिल विल प्यार व्यार’,‘अब तक छप्पन’,‘हासिल’,‘मिस टनकपूर हाजिर हो’,‘पेज३’आदी चित्रपटात काम केले. सन २०१६ मध्ये आलेल्या ‘30 मिनिट’ या चित्रपटातही ती दिसली होती. सन २००१ मध्ये आलेल्या ‘अशोका’ या चित्रपटाद्वारे हृषिताने बॉलिवूड डेब्यू केला होता. २००३ मध्ये आलेल्या ‘हासिल’मधील हृषिताच्या भूमिकेचे अनेकांनी कौतुक केले. यानंतर ती अनेक चित्रपटांत दिसली. हिंदीसोबतच बंगाली, तेलगू व मराठी चित्रपटांमध्येही हृषिताने काम केले. सन २०१५ मध्ये हृषिताच्या लग्नाची अफवा उडाली होती. मात्र असे काहीही नसल्याचे हृषिताने स्पष्ट केले होते. खरे तर हृषिताला आर्किटेक्ट बनायचे होते. मात्र सात वर्षांची असताना आईने हृषिताना कथ्थकच्या क्लासमध्ये टाकले. यानंतर १२ व्या वर्गात असताना अचानक रॅम्पवॉक करण्याची संधी हृषिताला मिळाली. एका शोमधील मुलगी अचानक आजारी पडली आणि  शिक्षिकेने या मुलीच्या जागेवर हृषिताना पाठवले. विशेष म्हणजे हृषिताने हा शो जिंकला. यानंतर मॉडेलिंग, जाहिराती तिला मिळाल्या. ‘मुव्हर्स अ‍ॅण्ड शेखर’ या शोमध्ये हृषिता गेली आणि त्याचदिवशी तिला सात ते आठ चित्रपटांच्या आॅफर्स आल्यात.
 

Web Title: SEE PICS: 'Ashoka' Fame Hrishita Bhatt stuck in a marriage!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.