SEE PICS : आमिर खानला दुबईहून पाठविला जगातील सर्वांत मोठा केक; किंमत वाचून दंग व्हाल!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2017 15:55 IST2017-08-11T10:20:05+5:302017-08-11T15:55:14+5:30
फॅन्स... फॅन्स असतात. मग ते कुठल्याही शहरात असो वा देशात, ते आपल्या आवडत्या सुपरस्टार्सचे दिवाणे असतात. दुबईमध्ये तर बॉलिवूड ...

SEE PICS : आमिर खानला दुबईहून पाठविला जगातील सर्वांत मोठा केक; किंमत वाचून दंग व्हाल!
फ न्स... फॅन्स असतात. मग ते कुठल्याही शहरात असो वा देशात, ते आपल्या आवडत्या सुपरस्टार्सचे दिवाणे असतात. दुबईमध्ये तर बॉलिवूड स्टार्सचे असे काही चाहते आहेत की, त्यांचा प्रत्येक चित्रपट चाहत्यांसाठी पर्वणीच ठरतो. सलमान खान, शाहरूख खान, आमिर खान यांना मानणारा तिथे खूप मोठा चाहता वर्ग आहे. त्यामुळेच दुबईहून एका चाहत्याने आपल्या फेव्हरेट स्टार्सला काहीतरी गिफ्ट पाठविल्याच्या बातम्या आपल्याला नेहमीच ऐकावयास मिळतात. आताही अशीच काहीशी बातमी समोर आली असून, दुबईहून आलेले हे गिफ्ट खूपच स्पेशल आहे. कारण ते स्विट असल्याने त्यात प्रेमाचा गोडवा आहे. होय, बॉलिवूडचा मिस्टर परफेक्टनिस्ट आमिर खान याला हे गिफ्ट आले असून, गिफ्ट म्हणून चाहत्याने एक मोठा केक पाठविला आहे. हा केक जगातील सर्वांत मोठा आणि महागडा केक समजला जात आहे.
![]()
![]()
या केकचे वैशिष्ट्ये म्हणजे यावर ‘दंगल’चा एक सीन बनविला आहे. ज्यामध्ये आमिर खानचा दंगल स्टाइल स्टॅच्यू आहे. विशेष म्हणजे केकवर भारताचा तिरंगाही दिसत आहे. केकवरून एक गोष्ट स्पष्ट होते की, केक पाठविणारा आमिरचा चाहता असून, त्याला ‘दंगल’ हा चित्रपट सर्वाधिक आवडला असावा. हा केक दुबईतील ब्रॉडवे बेकरी येथे बनविण्यात आला आहे. या बेकरीने दावा केला की, हा केक खाण्यायोग्य असून, जगातील सर्वात मोठा केक आहे. केकचे वजन ५४ किलो आहे. हा केक कमीत कमी दोनशे लोकांना सर्व्ह करता येऊ शकतो. हा केक बनविण्यासाठी ४० हजार डॉलर (जवळपास २५ लाख रुपये) ऐवढा खर्च आला आहे.
![]()
![]()
विशेष म्हणजे हा केक बनविण्यासाठी बाराशेपेक्षा अधिक लोकांनी मेहनत घेतली आहे. केक बनविण्यासाठी जवळपास एक महिन्याचा कालावधी लागला आहे. या केकचे आणखी एक वैशिष्ट्ये म्हणजे केकमध्ये सोन्याचाही वापर करण्यात आला आहे. केकवर लावण्यात आलेल्या मेडलमध्ये सोने वापरण्यात आले आहे. आमिरचा ‘दंगल’ हा चित्रपट गीता-बबिता फोगाट या महिला कुस्तीपटूंचा बायोपिक आहे. चित्रपटात आमिरने गीता आणि बबिताचे वडील महावीर सिंग फोगाट यांची भूमिका साकारली आहे. आतापर्यंत या चित्रपटाने वर्ल्ड वाइज दोन हजार कोटी रुपयांचा व्यवसाय केला आहे.