SEE PIC : पत्नी मान्यता दत्तने ‘अशा’ अंदाजात दिल्या संजय दत्तला शुभेच्छा!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2017 16:02 IST2017-07-29T10:31:50+5:302017-07-29T16:02:38+5:30

​अभिनेता संजय दत्त त्याचा ५८वा वाढदिवस साजरा करीत आहे. आजचा हा दिवस स्पेशल करण्यासाठी पत्नी मान्यता दत्त हिने संजूबाबाला अतिशय हटके अंदाजात विश केले आहे.

SEE PIC: Wife recognition Dutt wishes Sanjay Dutt to give 'such' award! | SEE PIC : पत्नी मान्यता दत्तने ‘अशा’ अंदाजात दिल्या संजय दत्तला शुभेच्छा!!

SEE PIC : पत्नी मान्यता दत्तने ‘अशा’ अंदाजात दिल्या संजय दत्तला शुभेच्छा!!

िनेता संजय दत्त त्याचा ५८वा वाढदिवस साजरा करीत आहे. आजचा हा दिवस स्पेशल करण्यासाठी पत्नी मान्यता दत्त हिने संजूबाबाला अतिशय हटके अंदाजात विश केले आहे. मान्यताने संजूबाबासोबतचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर करीत एक सुंदरसा संदेश शेअर केला आहे. मान्यताने संजूबाबा प्रति प्रेम व्यक्त करताना लिहिले की, ‘तुझ्यासोबत असल्याने मी सर्व बंधनातून मुक्त झाली आहे, वाढदिवसाच्या भरपूर शुभेच्छा’ मान्यताने शेअर केलेल्या या फोटोत दोघेही काळ्या रंगाचे टी-शर्ट परिधान करून आहेत. 

सध्या संजूबाबा त्याच्या आगामी ‘भूमी’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये रिलीज आहे. आजच त्याच्या वाढदिवसानिमित्त या चित्रपटाचे नवे पोस्टर रिलीज करण्यात आले आहे. पोस्टरमध्ये संजूबाबा खूपच डॅशिंग आणि रागीट अवतारात दिसत आहे. पोस्टरमध्ये त्याचा संपूर्ण चेहरा रक्ताने माखलेला आहे, तर डोळ्यांमध्ये प्रचंड राग दिसत आहे. या पोस्टरचे आणखी एक वैशिष्ट्ये म्हणजे यामध्ये संजयचा पूर्ण चेहरा दिसत आहे. जेव्हा चित्रपटाचे पहिले पोस्टर रिलीज झाले होते तेव्हा त्यामध्ये संजूबाबाचा चेहरा दिसत नव्हता. ते पोस्टरदेखील याच पोस्टरसारखे डॅशिंग अंदाजात होते. 
 

‘भूमी’ या चित्रपटानंतर संजय दत्त त्याच्या जीवनावर बनत असलेल्या बायोपिकमध्येही बघावयास मिळणार आहे. दरम्यान, संजूबाबाचा वाढदिवस साजरा करण्यात कुठल्याच प्रकारची कसर सोडली जात नसल्याचे दिसून येत आहे. पत्नी मान्यतासह त्याचे चाहते संजय दत्तचा वाढदिवस स्पेशल ठरावा याकरिता सर्वोत्तपरी प्रयत्न करताना दिसत आहेत. शिक्षा भोगून आल्यापासून संजय दत्त त्याच्या परिवाराला अधिकाधिक वेळ देण्याचा प्रयत्न करीत आहे. नुकताच तो विदेशात परिवाराला घेऊन गेला होता. 

असो, संजय दत्तला ‘सीएनएक्स मस्ती’कडून वाढदिवसाच्या शुभेच्छा!!

Web Title: SEE PIC: Wife recognition Dutt wishes Sanjay Dutt to give 'such' award!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.