SEE PIC : हृतिक रोशनने एक्स वाईफ सुजैन खान अन् मुलांसोबत बघितला ‘हा’ चित्रपट!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2017 18:42 IST2017-05-07T13:11:53+5:302017-05-07T18:42:34+5:30

अभिनेता हृतिक रोशन आणि त्याची एक्स पत्नी सुजैन खान यांच्यात जरी घटस्फोट झाला असला तरी, मुलांसाठी हे दोघे नियमितपणे ...

SEE PIC: Hrithik Roshan ex-wife Sujain Khan and 'Ha' movie with children! | SEE PIC : हृतिक रोशनने एक्स वाईफ सुजैन खान अन् मुलांसोबत बघितला ‘हा’ चित्रपट!

SEE PIC : हृतिक रोशनने एक्स वाईफ सुजैन खान अन् मुलांसोबत बघितला ‘हा’ चित्रपट!

िनेता हृतिक रोशन आणि त्याची एक्स पत्नी सुजैन खान यांच्यात जरी घटस्फोट झाला असला तरी, मुलांसाठी हे दोघे नियमितपणे एकत्र येत असतात. गेल्या दोन दिवसांत हे दोघे तब्बल दोनवेळा एकत्र आल्याने चर्चांना सध्या उधाण आले आहे. एका दिवसापूर्वीच हे दोघे संजय दत्त याच्याकडे डिनर पार्टीसाठी गेले होते. त्यानंतर पुन्हा काल सायंकाळी दोघेही आपल्या मुलांसोबत चित्रपट बघण्यासाठी गेले होते. 



हृतिक एक्स पत्नी सुजैन अन् दोन्ही मुले रेहान आणि रिदानसोबत चित्रपटगृहात पोहोचला. चौघांना एकत्र बघताना असे वाटत होते की, हा एक सुखी आणि आनंदी परिवार असावा. मात्र एक गोष्ट स्पष्ट होऊ शकली नाही की, हृतिकने मुलांना ‘बाहुबली-२’ हा चित्रपट दाखविता की ‘गार्डिन्स आॅफ द गॅलेक्सी २.०’ असो पण चौघेही एकत्र आल्याने त्यांच्या हृतिकच्या फॅन्सला काहीसे समाधान वाटले असावे, यात शंका नाही.  



कारण या फोटोंना बघून असे वाटत होते की, भलेही हृतिक आणि सुजैन यांच्यातील नाते २०१४ मध्ये संपुष्टात आले असले तरी, दोघांमधील मैत्री आजही कायम आहे. काही दिवसांपूर्वीच हृतिक आणि सुजैनने मोठा मुलगा रिदान याचा बर्थ डे सेलिब्रेट केला होता. गेल्यावर्षी हृतिक आणि कंगना रानोत यांच्यात लीगल फाइट रंगली होती, तेव्हा सुजैनने अतिशय चतुराईने हृतिकची बाजू घेतली होती. यावरून दोघांमधील प्रेम आणि मैत्री कायम आहे, हेच सिद्ध होते. 



आता तुमच्या मनात जर असा विचार येत असेल की या दोघांनी पुन्हा एकदा एकत्र यावे तर असे काहीही होणार नाही. कारण खूप दिवसांपूर्वीच सुजैनने स्पष्ट केले की, पुन्हा ती हृतिकबरोबर नातेसंबंध प्रस्थापित करणार नाही. सुजैनने सोशल मीडियावर लिहिले होते की, हृतिकबरोबर पुन्हा नातेसंबंध निर्माण करण्याचा मी विचार करणार नाही. मात्र आम्ही दोघे मुलांसाठी कायम चांगले आई-वडील राहणार आहोत. हृतिकच्या प्रोफेशनल लाइफविषयी बोलायचे झाल्यास तो लवकरच त्याच्या आगामी ‘क्रिश-४’च्या शूटिंगची सुरुवात करणार आहे. 

Web Title: SEE PIC: Hrithik Roshan ex-wife Sujain Khan and 'Ha' movie with children!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.