SEE PIC : प्रेक्षकांनी राजा अमरेंद्र बाहुबलीचा केला दुग्धाभिषेक !!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2017 14:39 IST2017-04-28T09:08:35+5:302017-04-28T14:39:37+5:30

या वर्षातील मोस्ट अवटेड चित्रपट ‘बाहुबली-२’ आज रिलीज करण्यात आला असून, प्रेक्षकांनी चित्रपटगृहांबाहेर अक्षरश: रांगा लावल्या आहेत. हैदराबादमध्ये तर ...

SEE PIC: Audacity of King Amarendra Bahubali's Danghdhishek !! | SEE PIC : प्रेक्षकांनी राजा अमरेंद्र बाहुबलीचा केला दुग्धाभिषेक !!

SEE PIC : प्रेक्षकांनी राजा अमरेंद्र बाहुबलीचा केला दुग्धाभिषेक !!

वर्षातील मोस्ट अवटेड चित्रपट ‘बाहुबली-२’ आज रिलीज करण्यात आला असून, प्रेक्षकांनी चित्रपटगृहांबाहेर अक्षरश: रांगा लावल्या आहेत. हैदराबादमध्ये तर चक्क प्रेक्षकांनी प्रभास आणि राणा दग्गुबाती यांच्या फोटोला दुग्धाभिषेक घालून त्यांचे फोटोज् फुलांनी सजविले आहेत. आतापर्यंत रजनीकांत यांच्या चित्रपटातील फोटोंना दुग्धाभिषेक घातल्याचे आपण बघत आलो आहोत, परंतु पहिल्यांदाच बाहुबली या चित्रपटाबाबत असे बघावयास मिळत असल्याने सध्या सोशल मीडियावर याची जोरदार चर्चा रंगत आहे. 

रजनीकांत यांच्या ‘कबाली’ या चित्रपटाच्या रिलीजवेळी प्रेक्षकांनी अशाचप्रकारे त्यांच्या फोटोला दुग्धाभिषेक घातला होता. आता अशीच काहीशी ‘दिवानगी’ ‘बाहुबली-२’विषयी बघावयास मिळत आहे. हा चित्रपट जगभरातील नऊ हजार स्क्रीन्सवर रिलीज करण्यात आला आहे. असे असतानाही या चित्रपटाच्या तिकिटांसाठी प्रेक्षकांना रांगेत उभे राहावे लागत आहे. यावरून तुम्ही कल्पना करून शकता की, चित्रपट सगळीकडेच हाउसफुल आहे. 



तिकीट मिळविण्याच्या धडपडीत निर्माण होत असलेले काही किस्से सध्या जोक्सच्या स्वरूपात सोशल मीडियावर शेअर केले जात आहेत. काही जोक्समध्ये तर तिकिटांसाठी आता बॅँका लोन देणार असल्याचे म्हटले आहे. असो, हा चित्रपट आज तामिळ, तेलगू, हिंदी आणि मल्याळम अशा चार भाषांमध्ये रिलीज करण्यात आला आहे. 

हैदराबाद आणि साउथमध्ये तर या चित्रपटाविषयी प्रचंड क्रेझ आहे. अशीच काहीशी क्रेझ मुंबईमध्येही बघावयास मिळत आहे. कारण चित्रपट बघून चित्रपटगृहाबाहेर येत असलेले प्रेक्षक चित्रपटाचे प्रचंड कौतुक करीत आहेत. समीक्षकांकडून तर या चित्रपटाला पाच पैकी पाच असे रेटिंग देत आहेत. त्यावरून तुमच्या लक्षात येऊ शकेल की, या चित्रपटाप्रती प्रेक्षकांमध्ये किती उत्सुकता आहे. }}}} ">Long queues at ticket counters in Hyderabad as #Bahubali2 released today pic.twitter.com/8iJ5zlnGDu— ANI (@ANI_news) April 28, 2017चित्रपटात प्रभास, राणा दग्गुबाती, अनुष्का, शेट्टी, तमन्ना भाटिया, सत्यराज आणि राम्या कृष्णन यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका असून, सगळ्यांनीच आपल्या भूमिकांना न्याय दिल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे. हा चित्रपट बॉक्स आॅफिसवरील आतापर्यंतचे सर्व रेकॉर्ड तोडण्याची शक्यता आहे. 

Web Title: SEE PIC: Audacity of King Amarendra Bahubali's Danghdhishek !!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.