SEE PIC : अक्षय कुमारचा मुलगा आरव मिस्ट्री गर्लसोबत झाला स्पॉट

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2017 19:34 IST2017-03-21T14:04:20+5:302017-03-21T19:34:20+5:30

सध्या इंडस्ट्रीमध्ये अभिनेत्यांपेक्षा त्यांची मुलेच अधिक चर्चेत आहेत. दरदिवसाला एक तरी स्टार किड्स काहीतरी कारनामा करताना माध्यमांच्या अग्रस्थानी असतो. ...

SEE PIC: Akshay Kumar's son Aarav Mystery came up with the girl | SEE PIC : अक्षय कुमारचा मुलगा आरव मिस्ट्री गर्लसोबत झाला स्पॉट

SEE PIC : अक्षय कुमारचा मुलगा आरव मिस्ट्री गर्लसोबत झाला स्पॉट

्या इंडस्ट्रीमध्ये अभिनेत्यांपेक्षा त्यांची मुलेच अधिक चर्चेत आहेत. दरदिवसाला एक तरी स्टार किड्स काहीतरी कारनामा करताना माध्यमांच्या अग्रस्थानी असतो. आता बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार याचा मुलगा आरवला गेल्या रविवारी रात्री उशिरा मुंबईच्या एका पीव्हीआर बाहेर बघण्यात आले. हा त्याचा कारनामा नसला तरी, तो ज्या मिस्ट्री गर्लसोबत स्पॉट झाला होता, त्याचा अद्यापपर्यंत उलगडा झाला नसल्याने तो चर्चेत आला आहे. 



आरवला जसेही बघण्यात आले तेव्हा काही कॅमेरामॅन त्याच्या दिशेने धावले. परंतु ही बाब आरवच्या लक्षात येताच त्याने डोक्यावर असलेल्या कॅपने स्वत:चा चेहरा झाकत तेथून कारच्या दिशेने पोबारा केला. कारमध्ये मित्रांसोबत बॅक सीटवर बसताना त्याने अंगातील जॅकेटने संपूर्ण चेहरा झाकून घेतला होता. आता प्रश्न हा निर्माण होतो की, आरव ज्या मुलीसोबत स्पॉट झाला ती मुलगी त्याची फ्रेंड होती का आणखी काही? पण काहीही असो आरवने ज्या पद्धतीने कॅमेºयापासून स्वत:ची सुटका केली त्यावरून नक्कीच या मिस्ट्री गर्लचे त्याच्या आयुष्यात महत्त्वपूर्ण स्थान असावे. 



१४ वर्षीय आरव नेहमीच लाइमलाइटमध्ये राहणाºया स्टार किड्सपैकी एक आहे. जुहूस्थित मोंडिअले वर्ल्ड स्कूलचा विद्यार्थी असलेल्या आरवला मार्शल आटर््समध्ये अधिक रस आहे. फेब्रुवारी २०१६ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबतचा आरवचा कान ओढतानाचा एक फोटो खूपच व्हायरल झाला आहे. मोदी यावेळेस आरवला ‘तो चांगला मुलगा आहे’ असे म्हणताना दिसत होते. 



वडील अक्षय कुमार याच्याप्रमाणेच आरवही सामाजिक कार्यात अग्रेसर आहे. तो त्याचे सर्व जुने साहित्य बालभवन श्रद्धाविहार येथे डोनेट करत असतो. त्याव्यतिरिक्त कपडे आणि त्याची खेळणी रस्त्यावरील गरीब मुलांना देत असतो. चॅरिटी व्यतिरिक्त पर्यावरणाप्रतीही आरव खूपच जागरूक आहे. कारण तो नेहमीच त्याच्या मित्रांना वृक्षारोपण करण्याचे आणि पाणी वाचविण्याचा संदेश देत असतो. 



एका मुलाखतीत अक्षय कुमारने म्हटले होते की, आमच्यात मैत्रीपूर्ण नाते आहे. मी त्याला कधीच याची जाणीव होऊ देत नाही की तो एका स्टारचा मुलगा आहे. आरवला अ‍ॅक्शन पसंत आहे. त्यामुळे कधी-कधी तो माझे चित्रपट बघत असतो. मात्र यासाठी मी त्याच्यावर कधीच दबाव आणत नाही. त्याचबरोबर ज्या पद्धतीने मी आयुष्य जगत आहे, माझे खानपाण, राहणीमान, बॉडी लॅग्वेंज आहे, त्यास कॉपी करण्याची अजिबात गरज नाही. त्याने त्याचा मार्ग स्वत: निवडायला हवा, असेही अक्षय म्हणाला होता. 

Web Title: SEE PIC: Akshay Kumar's son Aarav Mystery came up with the girl

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.