पाहा: ‘ओके जानू’ टायटल ट्रॅकचा ‘मेकिंग आॅफ’!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2016 09:56 IST2016-12-24T19:36:41+5:302016-12-25T09:56:32+5:30
चाहत्यांसाठी निर्मात्यांनी या टायटल ट्रॅकचा ‘मेकिंग आॅफ’ लाँच करावा लागला. या पेपी साऊंडट्रॅकला ए.आर.रहमान यांनी संगीतबद्ध केले असून मुंबईच्या रस्त्यांवरचे सुंदर चित्रीकरण या गाण्यात केल्याचे आढळून येते.
.jpg)
पाहा: ‘ओके जानू’ टायटल ट्रॅकचा ‘मेकिंग आॅफ’!
‘ के जानू’ चित्रपटातील आदित्य रॉय कपूर आणि श्रद्धा कपूर यांची हलकीफुलकी केमिस्ट्री तुम्हाला आवडते ना? ‘ओके जानू’ तील शीर्षक गीत लाँच झाले तेव्हाच त्याला यूट्यूबवर हजारो लाईक्स मिळाले. त्यामुळे चाहत्यांसाठी निर्मात्यांनी या टायटल ट्रॅकचा ‘मेकिंग आॅफ’ लाँच करावा लागला. या पेपी साऊंडट्रॅकला ए.आर.रहमान यांनी संगीतबद्ध केले असून मुंबईच्या रस्त्यांवरचे सुंदर चित्रीकरण या गाण्यात केल्याचे आढळून येते.
‘ओके जानू’ च्या शीर्षक गीतात मुंबईच्या रस्त्यांवर धम्माल बाईक चालवणारा आदित्य आणि त्याच्या मागे बसलेली बिनधास्त श्रद्धा कपूर यांना एकत्र पाहायला आपल्याला प्रचंड आवडलं. बर्फाचा गोळा खाताना, बेभान बाईक चालवतांना हवी ती मजा, मस्ती करताना ते आपल्याला यात दिसतात. गाण्याला जसे हजारो लाईक्स मिळाले तसे या मेकिंग आॅफचेही चाहते दिवाने झाल्याचे यूटयुबच्या आकड्यांवरून दिसतेय. दिग्दर्शक शाद अली यांनी खास चाहत्यांच्या आग्रहास्तव या मेकिंग आॅफला रिलीज के ले आहे. दिग्दर्शकांना बॉक्स आॅफिसवर या चित्रपटाचे आकडे वाढलेले पाहावयाचे असल्याने प्रत्येक प्रयत्न ते करताना दिसत आहे.
दाक्षिणात्य चित्रपट ‘ओके कन्मनी’ चा ‘ओके जानू’ हा चित्रपट हिंदी रिमेक आहे. १३ जानेवारीला चित्रपट रिलीज होणार असून ‘आशिकी २’ नंतर आदित्य-श्रद्धाची जोडी यात चित्रपटात पहावयास मिळणार आहे. पाहूयात, या चित्रपटातील त्यांची केमिस्ट्री चाहत्यांना कितपत आवडते ते!