​पाहा: ‘हंटरवाली’ कंगना राणौतचा हटके अवतार!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2017 11:53 IST2017-02-12T06:23:20+5:302017-02-12T11:53:20+5:30

कंगना राणौत सध्या ‘रंगून’च्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. पण हे काय? सर्वत्र कंगना हंटर घेऊनच फिरतेय. हंटरवाल्या कंगनाचा हा अवतार ...

See: 'Hunterwali' Kangana Raanoot's avatar !! | ​पाहा: ‘हंटरवाली’ कंगना राणौतचा हटके अवतार!!

​पाहा: ‘हंटरवाली’ कंगना राणौतचा हटके अवतार!!

गना राणौत सध्या ‘रंगून’च्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. पण हे काय? सर्वत्र कंगना हंटर घेऊनच फिरतेय. हंटरवाल्या कंगनाचा हा अवतार कदाचितच तुम्ही पाहिला असेल? शनिवारी एका इव्हेंटमध्ये कंगना अशीच ‘हंटरवाली’ बनून पोहोचली. ‘रंगून’मध्ये कंगना मिस ज्युलिया नामक कॅरेक्टर साकारते आहे. जी डान्सर आहे, सिंगर आहे. आयुष्यावर भरभरून प्रेम करणारी बिनधास्त ज्युलिया एकावेळी दोन व्यक्तिंवर जीवापाड प्रेम करते. एकाचवेळी दोन व्यक्तिंवर जीवापाड प्रेम करण्यात तिला काहीही गैर वाटत नाही.  यापूर्वी इतकी बोल्ड व्यक्तिरेखा कंगनाने साकारलेली नव्हती. या चित्रपटात कंगनाने अनेक बोल्ड सीन्सही दिले आहेत. चित्रपटातील या व्यक्तिरेखेत कंगना किती गढून गेलीय, हे तिच्या कालच्या इव्हेंटमधील फोटोंवरून तुमच्या लक्षात येईल.



ALSO READ : WATCH : ४० च्या दशकातील ‘ट्रेन’ अन् कंगना राणौतचा ‘टिप्पा’ डान्स!



काळ्या रंगाची कॅप, काळ्या रंगाचा ड्रेस, काळ्या रंगाचीच सँडल आणि हातात काळ्या रंगाचाच हंटर, अशा अवतारात कंगना या इव्हेंटमध्ये दिसली. ती  केवळ हंटर हातात घेऊन आली नाही तर तिने तो चालवला देखील.



ALSO READ : कंगना राणौतचा आरोप : हृतिकने माझे करिअर संपवण्यासाठी सगळे प्रयत्न केलेत



‘रंगून’ हा चित्रपट एक ‘इंटेन्स लव्ह स्टोरी’ आहे. या पीरियड ड्रामाचा ट्रेलर लोकांना चांगलाच भावला आहे. याशिवाय यातील ‘मेरे पिया गये इंग्लंड’,‘ये इश्क’, ‘ब्लडी हेल’ आणि ‘टिप्पा’ या गाण्यांनी प्रेक्षकांचे लक्ष वेधले आहे. विशाल भारद्वाज यांचा पीरियड रोमॅन्टिक ड्रामा असलेल्या या चित्रपटात सैफ अली खान, शाहिद कपूर आणि कंगना राणौत अशा तिघांचा अभिनय पाहायला मिळणार आहे.  यात ‘वॉर’ आहे आणि ‘लव्ह’ सुद्धा. यात शाहिद एका लष्करी अधिकाºयाच्या तर सैफ एका रॉयल भूमिकेत आहे.

Web Title: See: 'Hunterwali' Kangana Raanoot's avatar !!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.