पाहा : ‘ए दिल है मुश्किल...’
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2016 19:53 IST2016-09-06T14:23:20+5:302016-09-06T19:53:20+5:30
गत आठवड्यात ‘ए दिल है मुश्किल ’चे टायटल ट्रॅक आऊट झाले. या टायटल सॉन्गने लोकांना अक्षरश: वेड लावले. आता या गाण्याचा व्हिडिओ रिलीज झाला आहे.
.jpg)
पाहा : ‘ए दिल है मुश्किल...’
ट जर आऊट झाला आणि ‘ए दिल है मुश्किल ’ बद्दल लोकांची उत्सूकता शिगेला पोहोचली. गत आठवड्यात चित्रपटाचे टायटल ट्रॅक आऊट झाले. ‘ए दिल है मुश्किल ’ या टायटल ट्रॅकने लोकांना अक्षरश: वेड लावले. आता या गाण्याचा व्हिडिओ रिलीज झाला आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तर चित्रपट प्रदर्शित होण्याची प्रतीक्षा करणे आणखीच कठीण होणार आहे. होय, ‘ए दिल है मुश्किल ’ या चित्रपटातील टायटल ट्रॅकचा व्हिडिओ आज रिलीज करण्यात आला. व्हिडिओ जारी होताच तासाभरात हजारो लोकांनी तो पाहिला. व्हिडिओत अभिनेता रणबीर कपूर गाणे गाताना दिसत आहे. अभिनेत्री अनुष्का शर्मा, ऐश्वर्या राय बच्चन आणि फवाद खान यांची झलकही यात पाहायला मिळत आहे. एकतर्फी प्रेम, घनिष्ठ मैत्री आणि त्यातून होणारा हिरमोड असे हटके कथानक आणि ऐश्वर्या राय बच्चन आणि रणबीर कपूर यांच्यातील केमिस्ट्री यात दिसते आहे. तेव्हा पाहा तर!!