बघा, ‘सुल्तान’चा फर्स्ट लूक
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2016 19:51 IST2016-04-12T02:51:32+5:302016-04-11T19:51:32+5:30
सलमान खान याच्या बहुप्रतिक्षीत ‘सुल्तान’ या चित्रपटाचे पहिले पोस्टर आज सोमवारी आऊट झाले. ईदच्या मुहूर्तावर सलमानचा ‘सुल्तान’ प्रेक्षकांच्या भेटीला ...

बघा, ‘सुल्तान’चा फर्स्ट लूक
स मान खान याच्या बहुप्रतिक्षीत ‘सुल्तान’ या चित्रपटाचे पहिले पोस्टर आज सोमवारी आऊट झाले. ईदच्या मुहूर्तावर सलमानचा ‘सुल्तान’ प्रेक्षकांच्या भेटीला लागला आहे. या चित्रपटाबद्दल सलमानचे चाहते सुपर एक्साईटेड असतानाच आज याचे पहिले पोस्टर आऊट झाले. या पोस्टरमध्ये सलमान एकदम डॅशिंग पहलवानाच्या भूमिकेत दिसणार आहे. कुस्तीच्या मैदानात उतरण्यापूर्वी आखाड्यातील लाल माती माथ्यावर लावताना सलमान दिसतो आहे. यातील त्याचा अँग्री लूक एकदम झकास आहे. येत्या १४ एप्रिलला ‘सुल्तान’चा फर्स्ट ट्रेलर रिलीज होतो आहे. यशराज फिल्मचा हा चित्रपट अली अब्बास जाफर यांनी दिग्दर्शित केलेला आहे. अनुष्का शर्मा यात लीड रोलमध्ये आहे. या चित्रपटाची तुम्हाला प्रतीक्षा आहे. तूर्तास तरी ‘सुल्तान’चा फस्ट लूक आपण बघूयात!!